Type Here to Get Search Results !

परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाईल लपवला होता; निवृत्ती एसपींच्या आरोपाने खळबळ

मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त () यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परमबीर सिंह यांना कोर्टानं फरार घोषित केल्यानंतर आता पोलीस खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याने त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली, असा गंभीर आरोप मुंबईतील निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी केला आहे. शमशेर पठाण यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पीआय माळी यांनी आपल्याला कसाबकडून एक फोन सापडल्याने सांगितले होते. पण गिरगाव चौपाटीच्या ज्या सिग्नलवर कसाबला पकडले होते. त्या ठिकाणी परमबीर सिंह आले होते. त्यांनी तो फोन त्यांच्याकडे ठेवून घेतला. पण त्यांनी फोन तपास अधिकारी रमेश महाले यांना द्यायला हवा होता. या मोबाईलवरुन कसाब पाकिस्तानातील हँडलरशी संवाद साधत होता. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पठाण यांनी केली आहे. वाचाः दरम्यान, परमबीर सिंह हे भारताबाहेर नाहीत तर सध्या भारतातच आहेत. त्यांचा मुक्काम चंदिगड येथे असल्याचे स्पष्ट झाले आहे. टाइम्स नाऊने परमबीर यांच्याशी आज संपर्क साधला. यावेळी आपण लवकरच मुंबईत परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोर्टाच्या आदेशाचे मी पालन करणार आहे. मी पोलिसांच्या तपासाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/310oCBK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.