Type Here to Get Search Results !

आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडेची सुट्टी होताच नवाब मलिक म्हणतात...

मुंबई : महाराष्ट्राची (Maharashtra) आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग प्रकरणी(Aryan Drug Case) मंत्री नवाब मलिक () यांनी समीर वानखेडे ()यांना आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. आर्यन खानचा समावेश असलेल्या क्रूझ ड्रग प्रकरणातील तपासकर्ते समीर वानखेडे यांना आता या केसमधून हटवण्यात आले आहे. यावरच नवाब मलिक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही फक्त सुरुवात असल्याचं त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. अजून बरेच काही करायचे आहे, जे आपण करू असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरंतर, एनसीबीने समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एजन्सीच्या मुंबई झोन युनिटमधून क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि इतर ५ प्रकरणे ताब्यात घेतली आहेत आणि त्यांच्या तपासाची जबाबदारी दिल्ली मुख्यालयाकडे हस्तांतरित केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखेडे यांच्या जागी आयपीएस अधिकारी आणि एनसीबीचे उपमहासंचालक (ऑपरेशन्स) संजय सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत हा तपास एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे करत होते. गेल्या महिन्यात २ ऑक्टोबर रोजी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया या क्रूझवर छापा टाकून आर्यन आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, आर्यनच्या अटकेपासून महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडेवर सातत्याने आरोप करत आहेत. 'संपूर्ण यंत्रणा स्वच्छ करणे आवश्यक आहे' तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी ट्विट करत ही फक्त सुरुवात असल्याचं म्हटलं आहे. संपूर्ण यंत्रणा स्वच्छ करणे आवश्यक आहे. अजून बरेच काही करायचे आहे. मलिक यांच्या म्हणण्यानुसार, फक्त पाच प्रकरणांचा तपास केंद्रीय पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. अशी एकूण २६ प्रकरणे आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी. भाजप आमदार राम कदमांचा नवाब मलिकांवर निशाणा मुंबई भाजप आमदार राम कदम यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला असून, महाराष्ट्राच्या मंत्र्याने समीर वानखेडे यांच्या विरोधात २४ पत्रकार परिषद घेऊन आपण अंमली पदार्थांविरोधात लढणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे सिद्ध केले आहे. त्याचवेळी राम कदम यांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा असे घडते की, तपासादरम्यान एखाद्या अधिकाऱ्याकडे बोट दाखवले जाते, तेव्हा त्या प्रकरणाचा तपास नव्या अधिकाऱ्याकडे दिला जातो.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o1Ledc

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.