Type Here to Get Search Results !

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं तीव्र आंदोलन, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती?

कोल्हापूर : राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून संपात उतरले. जिल्ह्यात बारा आगारातून एसटी वाहतूक बंद झाली असून प्रवाशांचे मात्र हाल सुरू झाले आहेत. मागील बारा दिवसापासून असलेला संप चिघळला असून कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय एस.टी. कर्मचारी उत्फुर्तपण संपात उतरले आहेत. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात रविवारी मध्यरात्री बारा वाजता संपात चालक, वाहक, यांत्रिकी कामगार, लिपिक वर्ग उतरला आहे. रात्री दोन वाजेपर्यंत बाहेर गावाहून कोल्हापूर आगारात आलेली वाहने सोडण्यात आली. त्यानंतर एसटी वाहतूक बंद ठेवली. सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सीबीएससीसह मलकापूर, गारगोटी, कागल, जयसिंगपूर, इचलकरंजी, शिरोळ, राधानगरी, मलकापूर, शाहूवाडी आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत मागण्या केल्या. या संपामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. त्यांना खासगी प्रवासी बसेसचा आधार घ्यावा लागत असून खासगी कंपन्यांनी तिकीटाचे दर वाढवले आहेत. बारामतीत एसटी कामगारांचा मोर्चा राज्यभरात एसटी कामगारांच्या संपाला सुरुवात झाली आहे. बारामतीतील एसटी कामगारही या संपात सहभागी झालेत. आज या संपाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील कामगारांनी मोर्चा काढत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शासनाने एसटी कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये रात्री बारा वाजेपासून सर्व एसटी बस कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सुट्टी घेऊन आलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्रवासी तर मधेच अडकल्याने नेमकं घरी परतावं की पुढचा प्रवास सुरु ठेवावा या विचारात अडकले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात जाणाऱ्या बस खोळंबल्या आहेत. परप्रांतात जाणाऱ्या बसेस नसल्याने खासगी बस वाहतूक चालकांनी मात्र मनमानी दार आकारणे सुरू केले आहे. अनेक खाजगी वाहन चालक दुप्पट ते तिप्पट दर आकारत असल्याने प्रवाश्यांची लुट होत आहे. याबाबत मात्र प्रादेशिक परिवहन विभाग मुग गिळून गप्प आहे. रत्नागिरी गुहागर एसटी सेवा बंद रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. सकाळपासून सर्वच बस सेवा ठप्प असून ऐन दिवाळी सुट्टीत हे आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल सुरू झालेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3khzaDp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.