Type Here to Get Search Results !

मुंबईकरांनो सावधान! दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा विषारी?

मुंबईः राजधानी दिल्लीत वायु प्रदुषणामुळं संपूर्ण लॉकडाऊनची करण्याची तयारी असल्याची चर्चा असतानाच मुंबईकरांसाठीही धोक्याची सूचना देणारी माहिती समोर येते आहे. काल सोमवारी दक्षिण मुंबईतील हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदुषित होती. () दिल्लीतील प्रदुषणाचा वाढता स्तर हा चिंतेचा विषय ठरतो आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंतही गेलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषणातील वाढ ही आणीबाणीची स्थिती असल्याचे खंडपीठाने शनिवारी सुनावणीदरम्यान म्हटले होते. हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र आणि दिल्ली सरकारने त्वरित उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश देतानाच दिल्लीमध्ये वाहनांवर निर्बंध आणि लॉकडाउन यांसारख्या उपाययोजनाही न्यायालयाने सुचवल्या होत्या. दिल्लीत प्रदुषणाबरोबरच आता मुंबईतही हवेचा स्तर खालावत चालला आहे. समुद्रावरुन वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळं वाढलेलं प्रदुषण या सगळ्याचा परिणाम दक्षिण मुंबईतील हवेवर झाला आहे. काल सोमवारी दक्षिण मुंबईतील वायू प्रदुषणाचा निर्देशांक ३४५ अंकांवर जाऊन पोहोचला होता. तर, काल दिल्लीतल्या प्रदूषणाचा निर्देशांक ३३१ अंक इतका होता. त्यामुळं मुंबईकरांनी सावधानता बाळगायची गरज आहे. वाचाः माझगाव, मलाड आणि बीकेसीत प्रदुषण मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व भाग किनारपट्टीचे आहेत. मान्सूनच्या काळात नैऋत्य वारे जमिनीकडे वाहत होते. मात्र, आता हवा मोठ्या प्रमाणात प्रदुषित होते. तसंच, कमी तापमानाचा परिणामही हवेवर होत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. माझगाव येथे हवेचा स्तर ३२५ इतका होता तर, बीकेसी इथे ३१४, व मालाड येथे ३०६ प्रदुषणाचा निर्देशांक नोंदवला गेला होता. दिल्लीती हवेचा स्तर ३०१ ते ४०० पर्यंत पोहोचला होता. हवेची गुणवत्ता खालावल्याने त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो. त्यामुळं श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. वाहनांमुळं होणारे प्रदुषण, कचरा जाळल्यामुळं होणारा धूर, कारखाने आणि बांधकामामुळं होणारी धुळ यामुळंही प्रदुषणात वाढ होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l122R1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.