Type Here to Get Search Results !

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीमुळं रखडला पोलिसांचा तपास; दोन समन्सनंतरही गैरहजर

मुंबईः एनसीबीचे विभागीय संचालक (sameer wankhede) यांच्याविरोधातील तक्रारींच्या तपासाकरिता मुंबई पोलिसांनी बनविलेल्या विशेष पथकाचा तपास रखडला आहे. अभिनेता () याची मॅनेजर पूजा ददलानीला () समन्स बजावूनही चौकशीला येत नसल्याची माहिती समोर येत आहे. मुंब्र ड्रग्ज क्रुझ प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अनेक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. प्रभाकर साईलने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वानखेडे यांनी २५ कोटींची मागणी केली होती असा आरोप केला आहे. या सर्व तक्रारींची एकत्रित चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक पथक नेमले आहे. या प्रकरणातील सर्व संबंधितांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. मात्र, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला दोन समन्स बजावल्यानंतरही ती चौकशीसाठी गैरहजर राहिली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात पैसे देणारा तक्रारदार असणे महत्त्वाचे आहे. ददलानी यांनी ५० लाखांची रक्कम दिली का, हे त्याच सांगू शकतील. त्यामुळे पोलिस त्यांच्या जबाबाची वाट पाहत आहेत. मात्र, दोन समन्स बजावल्यानंतरही चौकशीसाठी गैरहजर राहिल्याने पोलिसांनी पुढे काय करावाई करावी यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. वाचाः पूजा ददलानी आपल्या प्रकृती अस्वास्थामुळे हजर राहू शकली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पूजानं मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला असल्याचीही माहिती समोर येत आहे. SIT आता लवकरच पूजाला तिसरं समन्स पाठवणार आहेत. जर पूजा तिसऱ्या समन्सनंतरही गैरहजर राहिली तर मात्र, पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणात विषेश पथकानं आत्तापर्यंत २० जणांचे जबाब नोंदवले आहेत. तर, सोमवारी सॅम डिसुझाला जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fl6lhz

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.