म. टा. प्रतिनिधी । 'राज्यात शिवसेना-भाजप युतीचा गेल्या २५ वर्षापासून चांगला संसार सुरू होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षाचा संसार मोडून टाकला', असा मिश्किल टोला माजी मंत्री () यांनी जलसंपदामंत्री यांना लगावताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा धाकटा मुलगा विक्रम याच्या लग्न सोहळ्याचे आयोजन सोमवारी पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या आवारात करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्यातील आजी, माजी मंत्री व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वधूवरांना आशीर्वाद देतांना गिरीश महाजन यांनी राजकीय फटकेबाजी केली. 'गुलाबराव पाटील यांच्याशी आमचे पूर्वीपासून कौटुंबिक संबंध आहेत. अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केलं. पण हा २५ वर्षांचा संसार तुम्ही (जयंत पाटील यांच्याकडं पाहून) मोडून टाकला. संसार मोडला असला तरी अजूनही आमचे स्नेहसंबंध कायम आहेत,' अशी कोपरखळी महाजन यांनी यावेळी मारली. त्यावेळी उपस्थितांना हसू आवरता आलं नाही. ही तर महाजनांची खदखद गिरीश महाजन यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील जोरदार उत्तर दिले आहे. राज्यातील भाजपचे सरकार गेल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांची खदखद अद्यापही संपलेली दिसून येत नाही. त्यामुळे लग्नसोहळे असो वा इतर कार्यक्रम त्या त्या ठिकाणी ही खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच गिरीश महाजन यांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेत नसून, त्यांच्या वक्तव्याला जास्त प्राधान्य देण्याची गरज नसल्याचे सांगितले. वाचा: या विवाहसोहळ्यासाठी राज्य मंत्रीमंडळातील डझनभर मंत्र्यांनी उपस्थित राहून वधु-वराला आशिर्वाद दिले. यामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील,परिवहन मंत्री अनिल परब, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार या मंत्र्यांचा समावेश होता. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3I2OM85