Type Here to Get Search Results !

देवकरांना न्यायालयाचा दिलासा; जिल्हा बँकेतील संचालकपद कायम

म. टा. प्रतिनिधी, जळगाव माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगितीविरोधातील दाखल पवन ठाकूर व रविंद्र पाटील यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने घरकुल प्रकरणी देवकरांच्या शिक्षेवर स्थगिती देण्याचा आदेश कायम ठेवल्यामुळे देवकरांचे जिल्हा बँकेतील संचालकपद कायम राहणार आहे. ( has been granted relief by the court and his post of director in the district bank has been retained) क्लिक करा आणि वाचा- माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना घरकूल घोटाळ्यात धुळे न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना पाच वर्षे शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. सध्याचा नियमानुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास कोणतीही निवडणूक लढविता येत नाही. मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयाने देवकरांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले असताना पवन ठाकूर यांनी मुंबई उच्चन्यायालयाच्या शिक्षेस स्थगिती देण्याचा आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञेय याचिका दाखल केली होती. या याचिकेत रविंद्र पाटील यांनीही हस्तक्षेप अर्ज देखील दाखल केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हे दोन्ही अर्ज निकाली काढले आहेत. क्लिक करा आणि वाचा- गुलाबराव देवकर यांच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी, ॲड. अनिकेत निकम, सुंधाशू चौधरी व ॲड. महेश देशमुख यांनी बाजू मांडली. वकिलांनी बाजू मांडताना घरकुल प्रकरणात देवकर यांचा केवळ ठरावांवर स्वाक्षरी करण्याइतपत सहभाग होता. त्यात त्यांनी कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ झालेला नाही. तसेच या प्रकरणी याचिकाकर्तांच्या देखील या प्रकरणी काडीमात्र संबध नाही. केवळ जळगावचे आहेत, म्हणून याचिका दाखल करता येईल, असा चुकीचा पायंडा यामुळे पडेल असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने वकिलांची बाजू ऐकून घेत मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षेवरील दिलेला स्थगितीचा निर्णय कायम ठेवला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rb1dJ3

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.