Type Here to Get Search Results !

'फडणवीसांच्या काळात रझा अकादमीवर बंदी का घातली गेली नाही?'

मुंबई: त्रिपुरातील घटनेनंतर अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारावरून () राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हिंसाचारामागे रझा अकादमी () असल्याचा आरोप झाल्यानंतर या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते () यांनी केलीय. त्यावरून शिवसेनेचे खासदार () यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 'फडणवीस यांच्या कार्यकाळात रझा अकादमीवर बंदी का घातली गेली नाही,' असा सवाल राऊत यांनी केला आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारनं रझा अकादमीवर बंदी घालावी, असं आव्हान फडणवीसांनी दिलं होतं. त्यांना राऊत यांनी उत्तर दिलं. 'फडणवीसांचं सरकार असतानाही राज्यात असे काही प्रकार घडले होते. तेव्हा त्यांनी रझा अकादमीवर बंदी का घातली नाही? महाराष्ट्राला कायद्याच्या राज्याची परंपरा आहे. इथं चेहरा पाहून कारवाई होत नाही. मुख्यमंत्री व गृहमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतीलच, असं राऊत म्हणाले. 'भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल झाले म्हणजे हिंदूंवर किंवा एकाच बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल होत आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे. जे दंगलखोर आहेत. ज्यांनी अमरावती पेटवली. ज्यांनी जनतेचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, ते कुणीही असू देत. त्यांना सोडलं जाणार नाही. कायदा सगळ्यांना सारखा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. वाचा: 'अमरावतीमधील वातावरण आता शांत झालं असताना उगाच कुणी काड्या टाकण्याचं काम करू नये. फडणवीस हे स्वत: राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. अमरावतीसारख्या घटना घडू नयेत म्हणून त्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अमरावतीसारख्या घटनांचं राजकारण, पेटवापेटवी ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा दंगलींसाठी ओळखला जाऊ नये,' असं राऊत म्हणाले. वाचा: अमरावतीमधील हिंसाचाराला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. तो आरोप राऊत यांनी फेटाळून लावला. 'इंटलिजन्स विभाताही शेवटी माणसंच काम करतात. त्यांच्याकडूनही त्रुटी राहू शकतात. देशभरात अनेक घटनांच्या संदर्भात इंटलिजेन्स फेल झाल्याची उदाहरणं आहेत. काश्मीरमध्ये होतं, त्रिपुरामध्ये होतं. तरीसुद्ध दंगल राज्यातील, अमरावतीमधील हिंसाचार नियंत्रणात आणला. आज अमरावतीत शांतता नांदतेय, हे जास्त महत्त्वाचं आहे,' असं संजय राऊत म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30P5EOo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.