Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांनी दिली माहिती

मुंबईः मानदुखीचा त्रास वाढल्याने रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल झालेले (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली होती. तर, तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, डॉक्टरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी सायंकाळी रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. मात्र गुरुवारी डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे अहवाल गुरुवारी सायंकाळी आले. त्यावरून वरिष्ठ डॉक्टर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला होता. त्यानुसार गुरुवारी चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली. या चर्चेत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी करण्यात आली आहे. वाचाः शस्त्रक्रियेनंतर आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मुख्यमंत्र्यांवर फिजिओथेरपी सुरू होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणीसंदर्भात एचएन रिलायन्स रुग्णालय कोणतेही मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करणार नसून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृतीसंदर्भातील अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच देण्यात येणार असल्याचे समजते. वाचाः सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असतानाच सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टवर एकनाथ शिंदे यांनी तातडीने खुलासा केला आहे. शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून खुलासा करत हा खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. जी पोस्ट व्हायरल होत आहे त्यात कोणतेही तथ्य नाही. ही पोस्ट अथवा अशा आशयाच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे शिंदे यांनी आवाहन केले आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ca09an

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.