गेल्या वर्षी करोना संसर्गामुळं दिवाळीसारखे मोठे सण साजरे करता आले नव्हते. मात्र, यंदा राज्यात करोना आटोक्यात आला आहे. रुग्णसंख्येत घटही दिसत आहे. त्यामुळं राज्य सरकारने नागरिकांना ऐन दिवाळीत करोना निर्बंधातून काही प्रमाणात सूट दिली आहे. त्यामुळं बाजारपेठेत पुन्हा एकदा चैतन्य परतलं आहे. नागरिकही दिवाळी उत्साहात साजरी करत आहेत. तर, राजकीय नेतेही यंदा दिवाळीचा सण उत्साहात साजरा करत आहेत.
राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना राजकीय नेत्यांच्या घरीही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शरद पवार, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या निवासस्थानी काल लक्ष्मीपूजन पार पडेल. राजकीय नेत्यांच्या दिवाळी सेलेब्रेशनचे खास फोटो...
देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या सागर या निवासस्थानी लक्ष्मीपूजन केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस व दिविजादेखील दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत.
नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी संपूर्ण कुटुंबासह लक्ष्मीपूजन करत दिवाळी साजरी केली आहे.
राजेश टोपे
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हेदेखील दिवाळीसाठी त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. टोपे हे त्यांचे मूळ गाव पाथरवाला येथे गेले आहेत. तिथे सहकुटुंब, सहपरिवारासोबत त्यांनी काल लक्ष्मीपूजन केलं आहे. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी,समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो! यंदाची दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो.अशी मनोकामना त्यांनी केली आहे.
धनंजय मुंडे
राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दरवर्षी प्रमाणे परळीतील बाजारपेठेत विविध व्यावसायिक आणि व्यापारी बांधवांना त्यांच्या दालनांमध्ये जाऊन लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या.
रोहित पवार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली आहे. रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार, पत्नी, आणि मुलांसोबत लक्ष्मीपूजन केलं.
विखे-पाटील
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही त्यांच्या परिवारासह दिवाळी साजरी केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी फोटो शेअर केले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ka5mbP