Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आग नेमकी कशामुळे?; ही माहिती आली समोर

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, ही आग लागली कशी? आणि मृत्यू नेमके झाले कसे? याबद्दल अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. प्राथमिक चौकशी आणि माहितीनुसार प्रथम रुग्णालयातील एसीला आग लागली, ती आटोक्यात आणण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे काही रुग्णांचा गुदमरून तर काहींचा दुसरीकडे स्थलांतर करीत असताना मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी एसीमध्ये लागलेली आग एवढी भडकली की संपूर्ण अतिदक्षता विभाग जळून खाक झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ( ) वाचा: भाऊबिजेच्या दिवशी सकाळीच ही दुर्घटना घडली. येथे संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी खास करोना कक्ष तयार करण्यात आला होता. पुढे रुग्ण वाढू लागल्याने त्याचेच अतिदक्षता विभागात रुपांतर करण्यात आले होते. नशिकमध्ये गॅस दुर्घटना घडल्यानंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयाचेही फायर ऑडिट करण्यात आले होते. तरीही ही दुर्घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या विभागात १७ जणांवर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, या विभागातील एसीला आग लागली. ती लक्षात आल्यावर हालचाली सुरू झाल्या. मात्र ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने आणि तोपर्यंत धूर आणि आग पसरल्याने एकच गोंधळ उडाला. तोपर्यंत रुग्णांना स्थलांतरित करण्यास सुरुवात झाली. हे काम सुरू असतानाच आग भडकत जाऊन आत प्रवेश करणेही अवघड होऊन गेले, अशी या घटनेसंबंधी प्राथमिक माहिती आता पुढे आली आहे. वाचा: मृतांच्या वारसांना ७ लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल राज्यमंत्री यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनीही चौकशीबाबत माहिती दिली. आगीच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख व एनडीआरएफ निधीमधून दोन लाख अशी सात लाख रुपये मदत दिली जाईल, असेही थोरात यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qdoJVe

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.