Type Here to Get Search Results !

शिक्षणाची बिकट स्थिती! पुणे जिल्हापरिषदेच्या आठशेहून अधिक शाळांमध्ये अंधार

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या आठशेहून अधिक अंधारात गेल्या आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात उजेड पसरवणारी शाळा अंधारात कशी जाऊ शकते? हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल ;पण लॉकडाऊन नंतर शाळा सुरु झाल्या आणि अनेक शाळांचे वीजबिल भरमसाठ आल्याने वीजबिल वेळेत भरण्यात आले नाही आणि त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या शाळांचा खंडित करण्यात आला आहे. (there is no electricity in more than 800 schools of ) पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ६३९ शाळा असून ८०० शाळांचा विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ८०० पैकी १२८ शाळांचे वीजमीटर काढण्यात आले असून ७९२ शाळांचा विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी महाराष्ट्र टाइम्स शी बोलताना सांगितले की, 'लॉकडाऊन नंतर शाळा सुरु करण्यासाठी ज़िल्हापरिषदेने आढावा घेतला असता २ हजार ८०० शाळांचा वीजपुरवठा सुरळीत सुरु असून ८०० शाळांमध्ये विजपुरवठ्याची अडचण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील MSEB च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून खंडित विजपुरवठा सुरळीत करून घेण्यासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे.' क्लिक करा आणि वाचा- त्याचप्रमाणे वीजपुरवठा कायमचा बंद केलेल्या शाळांमध्ये अजूनही काही अडचणी आहेत. कारण विलगीकरन कक्ष जेथे सुरु होते ते वीजबिल कुठून भरायचे व विजबिल न भरल्याने आलेला दंड कसा भरायचा असे अनेक प्रश्न होते. स्थानिक स्तरावरील उपलब्ध निधी व राज्यशासनातर्फे मिळालेल्या रकमेतून हे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत, असे प्रसाद यांनी माहिती देताना सांगितले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kL6zXk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.