Type Here to Get Search Results !

नाशिकमध्ये घबराट! एका रात्रीत पाच मेडिकल दुकाने फोडली; चोरीचा व्हिडिओ व्हायरल

नाशिकरोड: नाशिकरोड परिसरात (Nashik Road Robbery) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी परिसरातील पाच मेडिकलचे दुकाने फोडून हजारो रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडला. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत रोड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झालेला नव्हता. नाशिकरोड व परिसरात अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच मेडिकलचे दुकाने फोडली. त्यामध्ये महापालिकेच्या बिटको हॉस्पिटल समोर असलेल्या त्रंबक कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या तीन मेडिकलमधून चोरट्यांनी रक्कम चोरून नेली. त्यामध्ये पीके आयुर्वेदिक या मेडिकलमधून १८ हजार रुपये रोख, पीके हेल्थकेअर मधून दहा हजार रुपये रोख, नवकार मेडिकल, सागर मेडिकल व आणखी एका मेडिकलमधून चोरट्यांनी काही रोकड पळवल्याचे समजते. सदर घटनेप्रकरणी संबंधित मेडिकल मालकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी माहिती घेतली असली तरी रात्री उशिरापर्यंत याबाबत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समजते. दरम्यान या प्रकारामुळे दुकानदारांमध्ये घबराट निर्माण झाली असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे. वाचा: गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोड्या, दुचाकी गाड्यांची चोरी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे आदी प्रकार सातत्याने सुरूच असून आता चोरट्यांनी मेडिकल दुकानावर आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे व्यावसायिक व व्यापाऱ्यांमध्ये कमालीची चिंतेचं वातावरण आहे. दुचाकी चोरणारे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्याचप्रमाणे घरफोड्या करणारे सुद्धा हाती लागलेले नाहीत. रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त नसल्याने व्यापारीवर्ग हैराण झालेला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D1QPpa

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.