Type Here to Get Search Results !

शेवगावमध्ये तीन एसटी बसवर दगडफेक; संशयाची सुई 'यांच्या'कडे

अहमदनगर: एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन बससेवा सुरू केल्यानंतर शेवगाव आगाराच्या बसवर दगडफेक होण्याच्या तीन घटना घडल्या. एका घटनेत बसचालक किरकोळ जखमी झाला असून बसच्या काचा फुटल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वत: होऊन संप मागे घेत सेवा सुरू केल्यानंतरही ही दगडफेक कोणी केली असावी याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी यासंबंधी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडे बोट दाखविले आहे. बस सुरू होत असल्याने पंधरा-वीस दिवस त्यांचा तेजीत असलेला व्यवसाय बंद पडण्याच्या भीतीने त्यांच्यातील काही मंडळी हे कृत्य करीत असल्याचा कर्मचाऱ्यांना संशय आहे. परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर शुक्रवारी शेवगाव आगारातील एसटी कर्मचारी आणि आगारप्रमुख यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेऊन सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. बससेवाही सुरू करण्यात आली. नगर जिल्ह्यात केवळ या एकाच आगारातील संप मिटला आहे. मात्र, काही काळातच बसवर दगडफेकीच्या घटना घडल्या. वाचा: शेवगाव ते नगर बसवर (क्रमांक एमएच ४० वाय ५४२८) तालुक्यातील अमरापूरजवळ दगडफेक झाली. अज्ञात व्यक्तीने पाठीमागील बाजूने दगड मारल्याने बसची मागील काच फुटली आहे. तर शेवगाव-श्रीरामपूर बसवर (क्रमांक एमएच ४० एन ८८९५) सौंदळा (भेंडा नेवासा) येथे दगडफेक झाली. शेवगाव-पैठण बसवर (एमएम ४० एम ८७५२) दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी याची नोंद घेतली आहे. घटनास्थळीही पोलीस तात्काळ दाखल झाले. बससोबतही बंदोबस्त देण्यात येत आहे. शेवगाव आगरातील कर्मचाऱ्यांनी स्वत: होऊन संप मागे घेतला आहे. संप मागे घेताना एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप लबडे यांनी भूमिका स्पष्ट केली होती. ‘भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कामगारांना चिथावणी देऊन आंदोलन पेटविले. त्यानंतरही सरकार ऐकत नाही, असे लक्षात आल्यावर कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते संपातून निघून गेले,’ असा आरोप त्यांनी केला होता. त्यासोबतच सरकारवरही त्यांनी आरोप केला होता. ‘राज्य सरकार भेदभाव करीत आहे. ४१ टक्के पगारवाढ सरसरकट सर्व कर्मचाऱ्यांना द्यावी. त्यात वर्गवारी केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये द्विधा मनस्थिती झाली आहे. न्यायालयाचा अवमान होऊ नये, नागरिकांची गैरसोय होऊ नये याचा विचार करून कर्मचारी स्वत: होऊन संप मागे घेत आहेत. मात्र आमच्या मागण्यांसाठी लढा सुरूच राहील’, असे लबडे म्हणाले होते. वाचा: त्यानंतर लगेच आंदोलन मागे घेऊन सेवा सुरू झाली. शेवगाव आगारातून इतर ठिकाणी बस सोडण्यात आल्या. मात्र, तालुक्यातच तीन ठिकाणी बसवर दगडफेक होण्याची घटना घडल्या. त्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दगडफेकीच्या घटनेबद्दल विभागीय सचिव लबडे म्हणाले, ‘शेवगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन संघटना आहेत. त्या सर्वांच्या समतीनेच संप मागे घेतला आहे. याशिवाय राज्य पातळीवरील २८ संघटनांच्या कृती समितीचीही याला सहमती आहे. आमच्या मागण्यांवरील हक्क आणि वेगळ आंदोलन सरूच ठेवून बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे एसटी संघटनांपैकी याला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, संप काळात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच फावले होते. आता एसटी सुरू झाल्यावर त्यांचे उत्पन्न बुडणार या शक्येतेमुळे त्यांच्यापैकी काही विघ्नसंतोषी मंडळींनी हे कृत्य केले असावे, असा संशय घेण्यास वाव आहे. पोलिस आम्हाला सहकार्य करीत आहेत. दगडफेक करणाऱ्यांना ते शोधून काढतील तसेच या पुढे असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घेतील, अशी अपेक्षा आहे,’ असेही लबडे म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D17OIe

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.