Type Here to Get Search Results !

संपकरी कर्मचाऱ्यांचा पगार कापणार का?; अनिल परब म्हणतात...

मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांचा संप सलग सोळाव्या दिवशीही सुरू आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची घोषणा केली, त्यानंतर संपाला पाठबळ देणाऱ्या राजकीय नेत्यांनीही संपातून माघार घेतली. मात्र, कद्यापही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तसंच, सरकारकडून कर्मचाऱ्यांना आज शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. आज कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनीही आज पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. राज्यातील सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला लवकरच महिना होईल. अशातच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार मिळणार नसल्याच्या चर्चा आहेत. त्यावर अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे. वाचाः न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवला तर एक दिवसाला ८ दिवसांची पगारकपात केली जाईल. कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान करायचे नाहीय. जे कर्मचाऱी कामावर येतील त्यांना संरक्षण दिलं जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. एसटीने प्रवास करणारे प्रवासी हे आपलं दैवत आहेत. त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली तर एसटी अधिक अडचणीत येईल. कामगारांनी कारवाई करण्यासाठी भाग पाडू नये. जे कर्मचारी कामावर येऊ इच्छित आहेत त्यांना संरक्षण दिलं जाईल आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा अनिल परब यांनी केला आहे. वाचाः दरम्यान, एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ९२ हजार २६६ कर्मचारी आहेत. संपात ८२,५६१ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला असून यात चालक-वाहक तसेच कार्यशाळेतील एकूण ७९,६१७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत ९,७०५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nTWmd7

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.