Type Here to Get Search Results !

विनोद तावडे यांचे अखेर पुनर्वसन; राष्ट्रीय पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज संघटनात्मक पातळीवरील काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून महाराष्ट्रातील अनुभवी नेते यांचे पुनर्वसन करत त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची धुरा देण्यात आली आहे. यासोबत दोन राष्ट्रीय प्रवक्ते आणि दोन नवे सरचिटणीसही जाहीर करण्यात आले आहेत. ( ) वाचा: नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील पाच नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज जाहीर केल्या. त्यात महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना संधी देण्यात आली आहे. तावडे हे आता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असणार आहेत. बिहारमधील ऋतुराज सिन्हा व झारखंडमधील आशा लाकडा यांची राष्ट्रीय चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर भारती घोष आणि शहजाद पूनावाला असे दोन नवे राष्ट्रीय प्रवक्ते भाजपने दिले आहेत. वाचा: विनोद तावडे यांना अखेर बढती मिळालीच राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले विनोद तावडे हे गेल्या दोन वर्षांपासून काहीसे अडगळीत पडले होते. सरकारच्या काळात तावडे हे शिक्षणमंत्री होते. त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता कापण्यात आला होता. त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. पुढे विधानपरिषदेत संधी दिली जाईल, अशी तावडे यांना आशा होती पण त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळेच तावडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यातही तावडे हे पक्षात फारसे सक्रियही दिसत नव्हते. असे असतानाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी तावडे यांच्यावर विश्वास टाकत मोठी जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तावडे यांचे पक्षातील पुनर्वसन महत्त्वाचे मानले जात आहे. विनोद तावडे यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. वाचा: नाराज नेत्यांचे पुनर्वसन महाराष्ट्रातील भाजपचं सरकार गेल्यानंतर पक्षपातळीवर बऱ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेला एक गट पक्षात सक्रिय असल्याची कुजबूज नेहमीच असते. याच दरम्यान भाजपचे राज्यातील पहिल्या फळीचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा मार्ग धरला. याशिवाय पंकजा मुंडे, विनोद तावडे, या नेत्यांची नावेही अनेक कारणांनी सातत्याने चर्चेत राहिली. या सगळ्याचा विचार करत राष्ट्रीय पातळीवरून काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. प्रथम यांच्याकडे राष्ट्रीय चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच बावनकुळे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली तर आता विनोद तावडे यांचेही पुनर्वसन करण्यात आले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xahqyZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.