Type Here to Get Search Results !

या सरकारची ओळख एकच...; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजपचा खोचक टोला

मुंबईः राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी जवळपास २२३ एसटी आगारांमधील कर्मचारी-कामगारांकडून सुरू असलेल्या संपाचा तिढा आजही कायम राहिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपनं पाठिंबा दिला आहे. यावरुन भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. () भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्वीट केलं आहे. केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबईची मेट्रो थांबवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता गावाकडची एसटीदेखील थांबवून दाखवली. या सरकारची ओळख एकच ती म्हणजे 'सरसकट गैरसोयींचा विकास करणारे महावसुली सरकार' हे सरकार जनतेचे आणखी किती हाल करणार?, असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे. सध्या राज्यात २२३ आगार बंद असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. त्यातच आता राज्यातील सर्वच आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची घोषणा केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. वाचाः एसटी संपाचा तिढा सुटणार दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा प्रश्न उच्च न्यायालयातही पोहोचला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक विशेष समिती स्थापन करणार आहे. त्यासंबंधी जीआर आज दुपारी काढण्यात येणार आहे. राज्य सरकारतर्फेराज्य सरकारतर्फे न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर माहिती देण्यात आली. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o6rAwA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.