Type Here to Get Search Results !

प्रतिक काळे आत्महत्या प्रकरण: मंत्री शंकरराव गडाख म्हणतात, 'मी दोषी असेन तर...'

अहमदनगर: महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारण मंत्री व शिवसेनेचे यांच्याशी संबंधित शिक्षण संस्थेतील एका कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणावरुन भाजपनं महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप करत गडाख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली आहे. मात्र, केवळ राजकीय हेतू समोर ठेवून माझ्यावर हे आरोप केले जात असून मी कोणत्याही चौकशील सामोरे जाण्यास तयार असल्याचे गडाख यांनी म्हटले आहे. (i am being targeted with political motives in the suicide case and i am ready for any inquiry said minister ) क्लिक करा आणि वाचा- प्रतिक काळे असे या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो मुळा एज्युकेशन सोसायटीचत लिपिक पदावर काम करत होता. त्याने २९ ऑक्टोबर या दिवशी अहमदनगरमधील धनगरवाडी येथील एका शिवारात कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या राजीनाम्याची मागमी केली. एका मंत्र्याच्या पीएने आत्महत्या केली. त्याची दखल कुणी घेतली नाही. तो शंकरराव गडाख यांच्याकडे काम करत होता, असे उपाध्ये यांनी म्हटले होते. मात्र प्रतिक काळे माझा स्वीय सहाय्यक नव्हता. तो केवळ कॉम्प्यूटर ऑपरेटर होता, असे गडाख यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. 'प्रतिक काळेची आत्महत्या ही एक दुर्दैवी घटना आहे. मात्र प्रतिक काळे हा माझी स्वीय सहाय्यक नव्हता, तर तो केवळ कॉम्प्यूटर ऑपरेटर होता. विरोधक केवळ राजकीय हेतूने आरोप करत आहेत, या प्रकरणी मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत शंकरराव गडाख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. प्रतिक हा माझे बंधू प्रशांत गडाख यांच्या संस्थेत कॉम्प्यूटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. तो माझा स्वीय सहाय्यक नव्हता. विरोधकांनी एक तरी पुरावा ‌द्यावा ज्यात मी दोषी आहे हे समोर येईल, असेही गडाख म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणात जर मी दोषी असेन तर मला हवी ती शिक्षा द्या. प्रतिकवर माझ्याकडून कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. या प्रकरणी हवी ती चौकशी करा, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असेही गडाख यांनी म्हटले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZOrMss

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.