Type Here to Get Search Results !

साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; शिर्डीत यंदा दीपोत्सव होणार, पण...

अहमदनगर : मंदीर खुले झाल्यानंतर आलेला साजरा करण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने जय्यत तयारी केली आहे. मंदिरावर रोषणाई आणि सजावटही करण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनाच्यावेळी दर्शन थांबवण्यात येणार असले तरी पूजा संपताच पुन्हा दर्शन सुरू करण्यात येणार असल्याने यावर्षी भाविकांनाही दीपोत्सवाचा आंनद लुटता येणार आहे. संबंधीच्या सर्व नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा केला जाणार असल्याचे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. ( ) वाचा: संस्थानतर्फे परंपरेनुसार श्री लक्ष्मीपूजन उत्सव गुरुवारी (४ नोव्हेंबर) रोजी साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते ६ यावेळेत साईबाबा समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कुबेर पूजन, सरस्वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य असे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ५ वाजता दर्शनरांग बंद करण्याात येईल. लक्ष्मी-कुबेर पूजन झाल्यानंतर श्रींची धुपारती होऊन पावणेसात वाजता साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. वाचा: शनिशिंगणापूर येथील गणेश शेटे यांच्यावतीने देणगीस्वरूपात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शिर्डी येथील साईभक्त विजय तुळशीराम कोते यांच्या देणगीतून समाधी मंदीर, द्वारकामाई, चावडी व गुरूस्थान या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. रतलाम येथील श्री साई सेवा समिती ट्रस्ट यांच्यावतीने मंदीर परिसरात व प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. दीपावली श्रीलक्ष्मीपूजन उत्सवाचे सर्व कार्यक्रम करोना नियमांचे पालन करून करण्यात येणार आहेत, असे बानायत यांनी सांगितले. ऑफलाइन दर्शन खुले करा! शिर्डी येथे दरवर्षी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्यावर्षीपासून करोनामुळे त्यावर बंधने आली आहेत. असे असले तरी यावेळी मंदीर दर्शनासाठी खुले असल्याने दिवाळीत भाविकांना दर्शन उपलब्ध आहे. मात्र, अद्यापही केवळ ऑनलाइन दर्शनपास घेतलेल्या भाविकांनाच दर्शन घेता येत आहे. आता करोनाचे प्रमाण कमी झाले आहे. शिर्डीत करोना रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे आता भाविकांना ऑफलाइन दर्शन पास घेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी भाविक आणि शिर्डीतील पदाधिकाऱ्यांकडूनही करण्यात येत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CJCdLN

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.