Type Here to Get Search Results !

एकवीरा देवीच्या दर्शनावरून परतताना इको कारचा भयंकर अपघात, चालकासह ३ ठार, ९ जखमी

पालघर : पालघरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तब्बल नऊ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. () मिळालेल्या माहितीनुसार, इको कार आणि कंटेनरमध्ये जबरदस्त धडक झाली आणि त्यामुळे मनोरजवळ हा भीषण अपघात घडला. रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला असून यामध्ये चालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघात होताच याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. हे सगळे जण देवदर्शन करून घरी परतत असताना ही भीषण घटना घडली आहे. या अपघातामध्ये नऊ जण गंभीर झाले असून यामध्ये तीन देशमुख यांचाही समावेश जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (palghar car accident) (palghar car accident)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nBALpR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.