Type Here to Get Search Results !

दापोली नगराध्यक्षांच्या कुटुंबीयांचा राष्ट्रवादीत प्रवेश; नगराध्यक्ष परवीन शेख आता केवळ तांत्रिक दृष्ट्या सेनेत

दापोली: रत्नागिरी जिल्हयातील (Dapoli) नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या () यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान काँगेसचे भाऊ मोहिते यांची कन्या दीपाली व जावई श्री. पवार यांनीही हाती घड्याळ बांधले आहे. मात्र नगरसेवक पदाचा राजीनामा न दिल्याने शेख तांत्रिक दृष्टया सेनेच्याच आहेत. (family members of mayor parveen sheikh join now shaikh is only technically with ) कार्यकाळ संपल्यावर नगराध्यक्ष परवीन शेख राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती राष्ट्रवादीचे संदीप राजपुरे यानी दिली. नगराध्यक्ष परवीन शेख आता केवळ तांत्रिक दृष्टयाच सेनेच्या राहिल्या आहेत. रायगड कोलाड येथे रायगड मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगडमध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश पार पडला. दापोलीत हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. क्लिक करा आणि वाचा- राष्ट्रवादीने शिवसेनेच्या शहरातील राजकरणाला हा मोठा धक्का दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे काही महत्त्वाचे पदाधिकारी आमच्या पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांनी दिली आहे. निवडणुका होईपर्यंत असे पक्षीय अदलाबदल घडामोडी घडत राहतील हे निश्चित आहे. क्लिक करा आणि वाचा- पाच वर्षांपूर्वी परवीन शेख यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत परवीन शेख यांनी संचिता जोशी यांचा केवळ ११ मतांनी पराभव केला होता. आपल्या पहिल्या वहिल्या निवडणुकीतच त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. क्लिक करा आणि वाचा- परवीन शेख यानी २०१६ साली राजकारणात प्रवेश केला. तत्कालीन काँगेस नेते बाळासाहेब बेलोसे यांनीही त्यांना राजकरणात आशीर्वाद दिला होता. परवीन शेख यांचा अधिकृत पक्ष प्रवेश केवळ तांत्रिक बाबींमुळे लांबणीवर पडल्याचं सांगितले जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, नगरसेवक व उपजिल्हाध्यक्ष खालीद रखांगे यावेळी उपस्थित होते. दरम्यान या सगळ्या महत्वपूर्ण असलेल्या राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहण महत्वाच ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fx8XJk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.