मुंबई: आपले जावई () यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा विरोधी पक्षनेते () यांचा आरोप (Nawab Malik) यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळला आहे. 'माझ्या जावयाच्या घरात कुठलाही अमलीपदार्थ सापडलेला नाही. एनसीबीच्या पंचनाम्यातच तसा उल्लेख आहे. तो पंचनामा मी दाखवतो, फडणवीसांनी माफी मागावी,' अशा शब्दांत मलिक यांनी आज फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बनावट असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी एनसीबीचे काही अधिकारी व भाजपच्या विरोधात आघाडी उघडली आहे. हे वसुलीसाठी एनसीबीचा वापर करत असून भाजपच्या काही लोकांची त्यांना साथ आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे. तो आरोप फेटाळताना नवाब मलिक हे ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या जावयाला वाचवण्यासाठी हे सगळं करत असल्याचा दावा फडणवीस यांनी सोमवारी केला. 'ज्याच्या जावयाच्या घरात ड्रग्ज सापडलं, त्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत', असं फडणवीस म्हणाले होते. 'मी पुराव्यांशिवाय आरोप करत नाही आणि एकदा आरोप केल्यानंतर माघार घेत नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. वाचा: फडणवीस यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत मलिक यांनी आज आपली बाजू मांडली. 'माझ्या जावयाच्या घरी कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही. एनसीबीच्या पंचनाम्यामध्येही तसं नमूद आहे. ड्रग्ज सापडल्याच्या केवळ बातम्या पेरल्या गेल्या होत्या. मीडियाचीही फसवणूक करण्यात आली होती. समीर वानखेडे हा फडणवीसांच्या जवळचा माणूस आहे. त्यांनी पंचनामा मागवावा आणि शहानिशा करावी. तो पंचनामा मी दाखवणारच आहे,' असं मलिक म्हणाले. वाचा: 'देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत, त्यांच्याकडं सनद आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत सहा महिन्यांत चार्जशीट फाइल करायची असते. केस कमकुवत करण्यासाठी मी आरोप करत असल्याचं ते म्हणतात, पण एकदा चार्जशीट दाखल झाल्यानंतर केस कमकुवत होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं चुकीची माहिती देत असल्याबद्दल देवेंद्र फडणवीस माफी मागणार का?,' असा सवाल नवाब मलिक यांनी केला. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CGjwJc