Type Here to Get Search Results !

विक्रम गोखले यांनी केलं नरेंद्र मोदींचं कौतुक; म्हणाले, एक माणूस...

मुंबई: स्वातंत्र्याबद्दलच्या () हिच्या वक्तव्याचं समर्थन केल्यामुळं वादात अडकलेले अभिनेते () यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. इतिहासातील दाखले देतानाच देशातील सद्य परिस्थितीवरही आपली मतं व्यक्त केली. 'भारत हे हिंदू बहुल राष्ट्र आहे. या राष्ट्रानं तथाकथित धर्मनिरपेक्षता, सेक्युलॅरिझम जोपासण्याचं नाटक केलंय,' असं परखड मत गोखले यांनी मांडलं. भाजप व शिवसेना पुन्हा एकत्र यायला हवेत, असं मत गोखले यांनी पुन्हा एकदा व्यक्त केलं. 'खोट्या धर्मनिरपेक्षतेला माझा विरोध आहे. मी धिक्कार करतो. माझा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. स्युडो सेक्युलर लोकांना वाटतं की मी ठराविक लोकांच्या बाजूनं बोलतो. पण मी विद्यमान सरकारच्या विरोधातही जाहीरपणे बोलतो, असं गोखले म्हणाले. वाचा: 'काही राजकीय पक्षांत चांगली माणसं आहेत. त्याबद्दल मी चांगलंच बोलतो. जे चांगलं ते चांगलं. वाईट फेकून द्या अशा मताचा मी आहे. या देशाचे तुकडेच झाले पाहिजेत. इथे कम्युनिझम आलं पाहिजे अशी काही लोकांची सुप्त इच्छा आहे. याला माझा विरोध आहे. भाजप आणि शिवसेनेनं पुन्हा एकत्र यावं ही माझी इच्छा आहे. त्यांची गरज आहे. स्युडो सेक्युलॅरिझमला त्याची भीती वाटते,' असं ते म्हणाले. वाचा: 'जो धर्म शिरच्छेद करा असं शिकवतो, तो धर्म गेली दीड हजार वर्षं इथं तळ ठोकण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी तळ ठोकू नये म्हणून काही जण कार्यरत आहेत. पण, सत्तेची भूक लागलेले जे राजकीय नेते किंवा पक्ष आहेत. त्यांना हा देश एकसंध राहावा हे सहन होत नाही. अमेरिकेनं ज्यांना व्हिसा नाकारला, त्यांचा सन्मान होतोय हे त्यांना पाहवत नाही. एक माणूस, एक पक्ष काही तरी करतोय म्हटल्यावर तो लोकप्रिय होणारच. आमचं काय होईल असं वाटून इतर भुंकायला सुरुवात करतात, असं म्हणत विक्रम गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचं कौतुक केलं. '१९६२ चा भारत आज राहिलेला नाही. आजच्या भारतसमोर शत्रू थांबतो. या शत्रूंशी संबंधित काही राजकीय पक्षांचे नेते आहेत, असा आरोपही त्यांनी केला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kTwSe3

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.