Type Here to Get Search Results !

'२०२४ मध्ये राज्याला थोरातांच्या नेतृत्वाची गरज'; काँग्रेसच्या मंत्र्याकडून कौतुक

अहमदनगर: महसूलमंत्री (Balasaheb Thorat) हे शांत व संयमी नेते आहेत. २०१९ मध्ये संकटातही थोरात यांनी मोठ्या हिमतीने पक्षाचे नेतृत्व करीत यश मिळवून दिले. महाविकास आघाडीचेही ते शिल्पकार आहेत. आता २०२४ मध्ये राज्याला पुन्हा त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे, असे म्हणत दुग्धविकास मंत्री, काँग्रेसचे नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. (minister has expressed the view that maharashtra needs the leadership of in 2024) संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या राजहंस भुकटी प्रकल्पाचे उद्घान मंत्री केदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते. भोर तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महानंद व राजहंसचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, दुर्गाताई तांबे ,बाजीराव खेमनर यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- केदार विदर्भातील काँग्रेसचे नेते आहेत. मधल्या काळात काँग्रेसमध्ये फेबदल झाले तेव्हा थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद काढून ते विदर्भातील नेते नाना पटोले यांच्याकडे सोपविण्यात आले. पटोले आल्यापासून पक्षात धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर विदर्भातील पक्षाच्या मंत्र्यांने पुन्हा एकदा शांत, सयंमी व हिमती नेतृत्वाची गरज व्यक्त केल्याने केदार यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त होत आहे. यावेळी बोलताना मंत्री केदार यांनी थोरात यांच्या कार्यपद्धतीचे कौतूक केले. ते म्हणाले, सहकारातून संगमनेर तालुका समृद्ध झाला आहे. थोरात यांच्या शांत व संयमी नेतृत्वी चुणूक येथे पहायला मिळाली आहे. हा पॅटर्न राज्यभर राबवणे गरजेचे आहे. काँग्रेस अडचणीत असताना थोरात यांनी अत्यंत या हिमतीने पक्षाचे नेतृत्व केले. या जिल्ह्यातील ज्यांना काँग्रेस पक्षाने मोठे केले ते सत्तेसाठी पक्ष सोडून गेले. मात्र थोरात यांनी शर्तीने खिंड लढवत पक्षाला मोठे यश मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सरकार करतील हे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र अत्यंत अडचणीच्या काळात पक्षाचे नेतृत्व करणारे नामदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकार बनवण्यात अत्यंत मोलाचा वाटा उचलला असून तेच महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत, असेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- आमदार संग्राम थोपटे म्हणाले, थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार उभे राहिले आहे. शांत व संयमी नेतृत्वाच्या विविध क्षेत्रातील विकास कामांमुळे हा तालुका सधन झाला आहे. हाच पॅटर्न आता पश्चिम महाराष्ट्रात राबवणे अत्यंत गरजेचे आहे. महानंदा या संस्थेमध्ये रणजितसिंह देशमुख यांनी अत्यंत चांगली जबाबदारी सांभाळली असून राजहंस दूध संघामध्ये केलेले कामही तर संघासाठी आदर्शवत आहे, असेही थोपटे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- थोरात म्हणाले, दुग्धविकास मंत्री व महानंद यांच्या पाठपुराव्यातून करोना संकटात दररोज दहा लाख लिटर दुधाची पावडर करण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. यामुळे एकही दिवस बंद न घेता अशा संकटात आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. राज्यात हजारो टन पावडर तयार झाली. एक किलो पावडर बनवण्यासाठी २६० रुपये खर्च येतो. दूध पावडर पडून असताना असताना केंद्र सरकारने मात्र दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सहकारी संस्था अडचणीत आले आहेत, असा आरोपही थोरात यांनी केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BTIvHz

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.