मुंबई: कथित ड्रग पेडलर जयदीप राणा (Jaideep Rana) यांच्याशी () यांचे संबंध असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते () यांनी केलेल्या आरोपांना विरोधी पक्षनेते (Devendra Fadnavis) यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं. 'जयदीप राणा या व्यक्तीसोबत माझे व माझ्या पत्नीचे असलेले फोटो एका गाण्याच्या शूटिंगच्या वेळचे आहेत. मात्र, त्या व्यक्तीशी आमचा दुरान्वयेही संबंध नाही,' असा खुलासा फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमृता फडणवीस यांनी नदी पुनरुज्जीवनाचा संदेश देण्यासाठी गायलेल्या एका गाण्याला जयदीप राणा यानं अर्थपुरवठा केला होता. हा राणा ड्रग पेडलर आहे. त्याचे अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहेत. फडणवीस यांच्याच आशीर्वादानं महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरू आहे, असा आरोप मलिक यांनी केला होता. मलिक यांच्या या आरोपांना फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. वाचा: 'रिव्हर मार्च'ची ही संघटना नदी पुनरुज्जीवनाचं काम करते. त्यांच्या मोहिमेत मी आणि माझी पत्नी सहभागी झालो होतो. या मोहिमेच्या प्रचारासाठी त्यांनी एक गीतही रेकॉर्ड केलं होतं. अमृता फडणवीसांनी ते गायलं होतं. मलिक यांनी ट्वीट केलेला फोटो त्या शूटिंगच्या वेळचा आहे. मलिक यांनी उल्लेख केलेला व्यक्ती हा 'रिव्हर मार्च'च्या टीमसोबत आला होता. त्या संघटनेच्या क्रिएटिव्ह टीमनं त्याला हायर केलं होतं. त्याच्यासोबत माझाही फोटो आहे. पण माझा किंवा माझ्या पत्नीचा संबंधित व्यक्तीशी अजिबात संबंध नाही,' असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 'मलिक यांनी ट्वीट केलेले फोटो हे चार वर्षांपूर्वीचे आहेत. ते आज बाहेर आलेत. शिवाय, जयदीप राणा यानं कुठल्याही प्रकारचा अर्थपुरवठा केलेला नाही हे रिव्हर मार्च संघटनेनंच स्पष्ट केलंय,' असंही फडणवीस यांनी निदर्शनास आणलं. ...मग राष्ट्रवादी ड्रग्ज व्यापाराची सूत्रधार आहे असं म्हणायचं का? 'माझ्यासोबत आणि माझ्या पत्नीसोबत एखाद्या व्यक्तीचे असलेले फोटो शेअर करून नवाब मलिक हे भाजपचा संबंध ड्रग्ज रॅकेटशी जोडत आहेत. पण नवाब मलिक यांचे जावई ड्रग्जसकट पकडले गेले आहेत. मलिक यांचाच निकष लावायचा झाला तर मग राष्ट्रवादी काँग्रेस ड्रग्ज व्यापाराची सूत्रधार म्हणावी लागेल,' असंही फडणवीस म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZHaeOS