मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Nawab Malik) यांनी ड्रग्ज प्रकरणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर आरोप केले आहेत. तसंच, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ()यांच्यावरही निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला होता. त्यावर आता अमृता फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी आज सकाळीच अमृता फडणवीस यांचा फोटो ट्वीट केला होता. तसंच, जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरनं अमृता फडणवीस यांनी गायलेल्या रिव्हर अँथमला अर्थसहाय्य केलं होतं, असा दावा पत्रकार परिषदेत केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांवर अमृता फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. अमृता यांनी एक ट्वीट केलं आहे. वाचाः नवाब मलिकांच्या आरोपांनंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. अप्रत्यक्षरित्या अमृता यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?, कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते!, असं उत्तर अमृता यांनी दिलं आहे. वाचाः नवाब मलिक काय म्हणाले होते? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने अमृता यांनी एक गाणं गायलं होतं. नदी संरक्षण अभियानासाठी 'रिव्हर साँग' बनललं होतं. त्यात सोनु निगम व अमृता यांनी गाणं गायलं होतं. तर, त्यात देवेंद्र फडणवीस अभिनय केला होता. या गाण्याला जयदीप राणा यांनी अर्थसहाय्य पुरवलं होतं. राणा हे ड्रग्ज पेडलर आहेत. देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गणपती दर्शनाच्या वेळी देवेंद्र फडणवी व जयदीप राणा एकत्र आहेत. तसे फोटोही आहेत. हे प्रकरण राज्यातील ड्रग्ज व्यवसायासंबंधित आहे, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y1MC6w