Type Here to Get Search Results !

BJP corporator suspended: भरसभेत महापौरांच्या दिशेने बाटली भिरकावली; भाजप नगरसेवक निलंबित

सोलापूर: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय वाचण्याच्या कारणावरून सुरेश पाटील यांनी आपला राग व्यक्त करत महापौरांच्या दिशेने भरसभेत पाण्याची भिरकावली, यन्नम यांनी सुरेश पाटलांना निलंबित करत पोलिसांना त्यांना सभागृहा बाहेर काढण्याचे आदेश दिले.यामुळे भाजपाच्याचं नगरसेवकावर गैरवर्तनामुळे कारवाई करण्याची वेळ महापौरांवर ओढवली. (while the general meeting was going on suresh patil threw the bottle towards the ) शुक्रवारी मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पालिकेची सर्वसाधारण सभा सुरु होती. महापौर श्रीकांचन यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सभेला सुरुवात होताच महापौरांनी रोलिंग दिल्याप्रमाणे नगरसचिव रवींद्र दंतकाळे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचण्यास सुरुवात केली. दरम्यान विषय पत्रिका वाचून झाल्यानंतर महापौरांनी रोलिंग दिल्यानंतर सुरेश पाटील हे संबंधित विषयावर बोलण्याचा हट्ट धरून बसले. मला बोलायचे असताना आपण रोलिंग का दिला. आज संविधान दिन आहे. किमान आज तरी घटनात्मक पद्धतीने पालिकेच्या सभागृहाचे कामकाज चालू द्या, असं म्हणत पाटील यांनी, आपल्या हातातील पाण्याची बाटली महापौरांच्या दिशेने भिरकावली. क्लिक करा आणि वाचा- सुरेश पाटील यांच्या या कृतीने सभागृहाच्या संकेताला बाधा आली. स्वपक्षीय नगरसेवकाची ही कृती सभागृहाच्या संकेताला बाधा आणणारी असल्याचे लक्षात येताच महापौरांनी पालिका आयुक्तांना पोलिसांना आदेश देऊन सुरेश पाटलांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. महापौरांच्या दिशेने बाटली फेकणे किंवा सभागृहात असंसदीय वर्तन करणे हे निंदनीय असल्याचे सांगत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला. पाटील यांची कृती आणि महापौरांची कारवाई पालिका वर्तुळात आणि पक्षीय कार्यालयांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.विरोधकांच्या निषेधानंतर सुरेश पाटील यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. क्लिक करा आणि वाचा- मागील वीस वर्षांपासून मी नगरसेवक म्हणून पालिकेच्या सभागृहात उपस्थित राहून कामकाजात सहभाग घेत आहे. मी बाटली महापौरांच्या दिशेने फेकली नाही, असा खुलासा भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केलाय. सभागृहात भाजपच्या कार्यकाळातच पालिकेच्या महापौरांचा अवमान होणाऱ्या घटना बऱ्याच वेळा घडल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HUq0qF

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.