मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik)यांनी आजही पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक () यांच्यावर आरोप केले आहेत. कोर्डेलिया क्रुजवरील पार्टीचं आयोजन करणाऱ्या काशिफ खानला वानखेडेंनी अटक केली नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांवर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत आणखी काही गौप्यस्फोट केले आहेत. काशिफ खान कोण आहे? याबाबत नवाब मलिकांनी खळबळजनक खुलासा केला आहे. मी एका दाढीवाल्याचं नाव घेतलं होतं. या दाढीवाल्याचं नाव काशिफ खान असं आहे. तो त्या पार्टीत होता. फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. तो सेक्स रॅकेट चालवतो. तो समीर वानखेडेंचा मित्रं आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांवर समीर वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. वाचाः नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत समीर वानखेडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी केवळ दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. हे आरोप धादांत खोटे आहेत. मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आता कायदाच त्यावर योग्य ती कारवाई करेल, असं समीर वानखेडेंनी म्हटलं आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31cIMsB