Type Here to Get Search Results !

एसटी चालकाची आत्महत्या, पडळकरांनी सरकारला दिला 'हा' इशारा

अहमदनगरः एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि संपासंबंधी भाजपचे आमदार यांनी काल रात्रीच महाविकास आघाडीवर टीका केली होती. यानंतर आज सकाळी शेवगाव डेपोतील चालकाने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर पडळकरांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. शेवगाव डेपोतील चालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनी एसटी बसलाच गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. यासंबंधी आमदार पडळकर यांनी म्हटले आहे, 'ही घटना तळपायाची आग मस्तकात जाणारी, मनाचा थरकाप उडवणारी आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत दु:खद घटना घडली आहे. काकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हे दु:ख शब्दात सांगणही कठीण आहे. माझी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की कुणीही टोकाचे पाऊल उचलू नका. एकजूटीने आपण हा लढा लोकशाही मार्गाने जिंकू. या आत्महत्या केलेल्या २८ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ,' असा दिलासा पडळकर यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. वाचाः त्यापूर्वी त्यांनी या प्रश्नावरून राज्य सकारला धारेवर धरत कडक इशाराही दिला. राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना उद्देशून त्यांनी म्हटले आहे की, 'गेल्या ६ महिन्यात २७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांची कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यांच्या सोबत घाणेरडे राजकारण करणे बंद करा. एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा, अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा,' असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे. वाचाः 'कर्मचाऱ्यांनी उत्फुर्तपणे संप पुकाराला आहे, मात्र काही संघटनाना हातीशी धरून सरकारकडून संप मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीकरण आणि राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे फायदे मिळावेत ही प्रमख मागणी आहे. सरकारने यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. मात्र, सरकार जे देऊ करते आहे, त्यावर कर्मचारी खूष असतली तर आमचे काही म्हणने नाही. अन्यथा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठाम राहून मागण्या मान्य होऊपर्यंत लढत राहू,' असेही पडळकर यांनी म्हटले आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vS0pcs

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.