Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे आणि संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, राजकीय खळबळ

गडचिरोली : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे नक्षलवाद्यांकडून ही धमकी दिली असल्याचं बोललं जात आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे फक्त एकनाथ शिंदे यांनाच नाहीतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या महिन्यात ही धमकी आल्याची माहिती राज्याच्या गृहविभागाने दिली होती. पोलिसांनी यावर तात्काळ पावले उचलली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांकडून ही धमकी दिली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या दिशेने पोलीस तपास सुरू असून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना अधिक संरक्षण देण्यात आलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vYODNA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.