Type Here to Get Search Results !

मुंबईत उद्यापासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार; 'असा' आहे आदेश

मुंबई: निर्बंधांबाबत राज्यासाठी सुधारित आदेश जारी करताना सरकारने मुंबईचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोपवला होता. त्यानुसार आपल्या अधिकारात आयुक्त यांनी पालिका क्षेत्रासाठी आदेश जारी करत निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथीलता दिली आहे. नवे आदेश उद्यापासून (३ ऑगस्ट) लागू केले जाणार आहेत. ( ) वाचा: राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी करण्याबाबत जो आदेश जारी झाला आहे त्यात सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडी ठेवता येणार आहेत तर शनिवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवता येतील व रविवारी जीवनावश्यक वगळता बाकी दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. मुंबईकरांना याबाबतीत मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या आदेशात नमूद केल्यानुसार, मुंबईतील सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. विशेष म्हणजे आठवड्याचे सर्व दिवस दुकाने उघडी ठेवण्याची मुभाही देण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यांत पालिका क्षेत्रात १.७६ टक्के इतका असल्याने तसेच ऑक्सिजन बेड व्याप्तीचा सरासरी दर १८.९७ टक्के इतका असल्यानेच ही सूट देण्यात आली आहे. वाचा: दरम्यान, मॉलबाबत पालिकेच्या आदेशात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याचवेळी लोकलची दारे सर्वांसाठी खुली होणार की नाही, याबाबतही आदेशात काहीच म्हटलेले नाही. त्यामुळे दूरवरून मुंबईत कामानिमित्त येजा करणाऱ्या प्रवाशांची कुचंबणा तूर्त कायम राहणार आहे. लोकल बाबत राज्य स्तरावरूनच निर्णय होईल, असेही आता स्पष्ट झाले आहे. अशी मिळणार शिथीलता... - सर्व दुकाने आणि आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. त्याचवेळी मेडिकल आणि केमिस्ट दुकाने आठवड्यातील सर्व दिवस २४ तास उघडी ठेवता येतील. - सर्व रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. - जलतरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे प्रकार वगळून अन्य इनडोअर आणि आऊटडोअर खेळांना आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असेल. - चित्रीकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी असेल. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A7Z8yZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.