Type Here to Get Search Results !

राज्यपालांच्या दौऱ्यावर ठाकरे सरकारचा आक्षेप; भाजपचे नेते म्हणतात...

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल हे राज्यात दोन सत्ताकेंद्रं निर्माण करू पहात आहेत, असा थेट आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नोंदवल्यानंतर त्यावर भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी यावरून नवाब मलिक यांना लक्ष्य केलं आहे. ( ) वाचा: राज्यपाल ५ ऑगस्टपासून नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याच्या रूपरेखेवरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याचवेळी मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने संदेश घेऊन मुख्य सचिव राजभवनात जाणार आहेत व राजभवनच्या सचिवांना याबाबत अवगत करणार आहेत. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून वारंवार सरकारच्या कामात हस्तक्षेप होत असून आपण मुख्यमंत्री नाही हे राज्यपालांनी पहिल्यांदा समजून घ्यावे', असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले. त्यावर प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला आहे. वाचा: 'राज्यपाल हे मुख्यमंत्री नाहीत पण राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्याही वर आहेत. घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात हे नवाब मलिक यांना माहीत नाही का?', असा सवाल दरेकर यांनी केला. राज्यपालांचे अधिकार काय, हे घटनेत नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून काळजी घेत त्यांनी दौरे केले, राज्याचा आढावा घेतला तर यामध्ये राजकीय वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्याची काळजी घेण्यासाठी आढावा बैठक ते घेऊ शकतात, असेही दरेकर म्हणाले. राज्यपाल नांदेडमधील विद्यापीठाच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. नांदेड येथील विद्यापीठ असो किंवा कोणतेही विद्यापीठ त्यांच्या अंतर्गत असतात. त्यामुळे विद्यापीठात जाणं, त्या विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, यामध्ये काहीच गैर नाही, असेही दरेकर यांनी नमूद केले. रोज काहीतरी बोललच पाहिजे असा अट्टहास म्हणजे नवाब मलिक 'रोज काहीतरी बोललंच पाहिजे असा अट्टहास असलेले नेते म्हणजे नवाब मलिक', असा टोला लगावत भाजप आमदार यांनीही मलिक आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं. राज्य सरकार पूरग्रस्त भागापर्यंत पोहोचलं नाही पण राज्यपाल पोहोचले यावर खर तर सरकारला शरम वाटली पाहिजे पण राज्यपालांवर टीका करून वातावरण निर्मिती करण्यापलीकडे हे काही करत नाहीत. अपयशी ठरलं आहे म्हणूनच जनतेला राज्यपालांकडे दाद मागावी लागते हे लक्षात घ्या, असे शेलार म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rSE1gQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.