Type Here to Get Search Results !

सरकारी कर्मचाऱ्यांच्या लोकल प्रवासात अडथळा; राज्य सरकारचे रेल्वेला पत्र

मुंबईः मुंबईत करोना संसर्ग नियंत्रणात आला आहे. (Mumbai Corona Update)सर्वसामान्यांसाठी मुंबईची उपनगरी लोकलसेवा अद्याप खुली झालेली नाहीय. मुंबई लोकलमध्ये सर्वांना परवानगी मिळावी याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, सर्वसामान्यांबरोबरच सरकारी कर्मचाऱ्यांनादेखील लोकल प्रवासात (Mumbai Local)अडथळा येत असल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारनेच (Maharashtra Government)रेल्वे विभागाला पाठवलेल्या पत्रातून ही गोष्ट समोर आली आहे. करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलप्रवासाची परवानगी द्यावी, या मागणीसाठी राजकीय पक्षांनी आंदोलन पुकारलं आहे. तर, सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांनीही लोकल प्रवास सर्वांसाठी खुला करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी असतानाही कर्मचाऱ्यांना प्रवास करता येत नसल्याचं समोर आलं आहे. याबाबत राज्याच्या आपातकालीन विभागानं पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. वाचाः व केंद्र सरकारचे वैध ओळखपत्र असणाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारच्या अनेक कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्र असूनही लोकलमधून प्रवास करता येत नाही, असं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं कामावर पोहोचण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळं सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्र असेल, तर त्यांना मासिक पास दिला जावा, असं ही पत्रात म्हटलं आहे. वाचाः लोकलप्रवासाबाबत दोन दिवसांत निर्णय सर्वसामान्य प्रवाशांना लोकलप्रवासाची परवानगी देण्याची मागणी होत असतानाच याबाबत येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दिली. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय कळेल. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना केवळ लोकलप्रवासातच नाही, तर इतर गोष्टींतही सवलत मिळू शकते. याबाबत काळजीपूर्वक चर्चा करूनच निर्णय घेऊ, असेही आदित्य म्हणाले. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ahqi6s

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.