Type Here to Get Search Results !

ट्रक चालकाची ओमनीला धडक; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूर: सांगोल्यानजीक कारंडेवस्ती येथे समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने ओमनी कारला समोरा-समोर धडक दिल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन मुलींचा समावेश आहे. सदरचा १ ऑगस्टला सायंकाळी साडेसात वाजता घडला. या अपघाताची फिर्याद माणिक शिंगाडे रा. उदनवाडी यांनी दिल्यानंतर सांगोला पोलिसांनी २ ऑगस्टला ट्रक चालकाविरोधात रीतसर गुन्हा नोंदवला आहे. उदनवाडी ता.सांगोला येथील दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हे खासगी वाहनचालक म्हणून काम करत होते. १ ऑगस्ट रोजी झापाचीवाडी-उदनवाडी येथून ३ महिला, ३ पुरुष आणि ६ लहान मुलं यांना घेऊन कर्नाटकातील सिंदगीकडे निघाले होते. करांडे पाटीजवळ उड्डाणपूलाच्या उजव्या सर्व्हिस रोडवरून आल्यावर ओमनी क्रमांक एम एच १२, एच एफ ९६०४ ला समोरून येणाऱ्या एम एच १३, सी यु ६०८६ या ट्रकने जोराची धडक दिली. ही अपघात इतका भीषण होता की त्यात तीन जण ठार झाले तर ९जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ओमनी चालक दाजीराम शिंगाडे (वय ४२) रा. उदनवाडी, सांगोला, कारमधील प्रवाशी कावेरी मनोज हरिजन (वय ७) रा.निरलगी, ता.ताळेकोटी, जि.विजयपूर आणि गुड्डी चंद्रकांत मगिरी (वय ८) रा.कोंडगुडी, ता.जेवरगी, जि.गुलबर्गा हे मृत्युमुखी पडले तर उर्वरित भारती, मनोज हरिजन आणि मगिरी परिवारातील चंद्रकांत, दीपा, मानवेश, ताराबाई, मुतुराज,अंबिका, चिनु हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पलायन केले. त्यामुळं सांगोला पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37dYvqT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.