Type Here to Get Search Results !

सोलापूर राष्ट्रवादीत मतभेद; जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला कार्याध्यक्षांची स्थगिती

: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या, नवीन पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने हा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येत असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीच्या एका जाहीर कार्यक्रमाच्या पोस्टरवर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचं छायाचित्र न लावल्याने झालेला वाद ताजा असताना आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष निवडीवरुन नवा वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी बिपिन करजोळे यांची निवड केली होती. या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करजोळे यांना देण्यातही आले होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी करजोळे यांच्या निवडीला स्थगिती दिली आहे. उमेश पाटील हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' या मोहिमेनिमित्त नागरिकांचा जनता दरबार संपूर्ण जिल्हा परिषद गटांमध्ये राबवत आहेत. असं असताना दक्षिण तालुक्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष बिपीन करजोळे यांनी कोणताही कार्यक्रम घेतला नाही. उलट पूर्वीचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सर्व नियोजन करून चांगल्या पद्धतीने नागरिकांचा जनता दरबार हा कार्यक्रम घेतला. याच पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी वरिष्ठांची बोलून बिपिन करजोळे यांची तालुकाध्यक्षपदी केलेल्या निवडीला तडकाफडकी स्थगिती दिली. त्याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AcOh6K

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.