Type Here to Get Search Results !

युवासेनेला मिळणार नवा अध्यक्ष; वरुण सरदेसाईंचं नाव चर्चेत?

मुंबईः राज्याचे पर्यावरण मंत्री (aaditya thackeray) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर आता युवासेनेचे प्रमुखपद शिवसेने नेते व आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ ()यांच्याकडे दिले जाईल अशी चर्चा रंगली आहे. राज्यात महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे मंत्रिपदाच्या कामात व्यस्त असल्यानं युवासेनेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या वरुण सरदेसाई युवासेनेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. वरुण सरदेसाई हे ठाकरे कुटुंबाच्या अतिशय जवळचे आहेत. आदित्य ठाकरेंचं विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांचाकडे पाहिले जाते. आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह पहिल्यांदा वरुण सरदेसाई यांनी केला होता. त्यामुळं आदित्य ठाकरेंच्या आमदार होण्याच्या प्रवासात सरदेसाईंचा मोलाचा वाटा आहे. आमागी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेनं आत्तापासून कंबर कसली आहे. ही निवडणुक शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरली आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकांआधी युवा कार्यकर्त्यांची फौज उभी करण्याचा युवासेनेचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने शिवसेनेत बदलाचे वारे वाहत आहेत. वाचाः सध्या वरुण सरदेसाई विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातून सरदेसाई यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्ते व पदधिकाऱ्यांची मोट बांधण्यासाठी वरुण सरदेसाई यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन ते पदधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. वरुण सरदेसाई हे गेल्या काही दिवसांत राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळं युवासेनापदी त्यांची वर्णी लागणार असल्याची दाट शक्यता आहे. ठाकरे घराण्याबाहेरील व्यक्तीकडे जाणार युवासेनेचे प्रमुखपद? जर युवासेनेचे प्रमुखपद वरुण सरदेसाईंकडे गेलं तर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाहेरील व्यक्तीकडे महत्त्वाचे पद जाणार आहे. युवासेनेचे प्रमुखपद आतापर्यंत कधीही ठाकरे कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीस देण्यात आलेले नाही. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U34wE8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.