Type Here to Get Search Results !

व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून जिममध्ये गेले, व्यायाम करताना असं काही झालं की पोलीसाचा जागीच मृत्यू

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते जिममध्ये व्यायामसाठी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी सांगितली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूसमयी सुहास भोसले यांचे वय ५६ वर्षे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. दररोज सकाळी दोन तास व्यायाम करणाऱ्या आधिका-याचा अश्याप्रकारे जिममध्येच अनपेक्षित मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनाला धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सुहास भोसले हे डिव्हिजन क्रमांक एक याठिकाणी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. जेलरोड पोलीस ठाण्यात हे कार्यालय होते. १ एप्रिल २०२१ रोजी ते अमरावतीहून सोलापूरात जॉईन झाले होते. यापूर्वी त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलांतही सक्षमपणे काम केलं होतं. त्यांनी ड्युटीकाळात नेहमी कम्युनिटी पोलिसिंग ला प्राध्यान्य दिलं होतं. त्यामुळं त्यांची पोलिसदलात एक चांगला अधिकारी अशी ओळख होती. आज त्यांच्या अचानक जाण्याने त्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅपस्टेस्ट्सची सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच अश्विनी हॉस्पिटलमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. खरंतर, रोज सकारा त्मकतेने दिवसाची सुरूवात करणारे सुहास अशा प्रकारे आपला जीव गमावतील याचा कोणी विचारच केला नव्हता.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lSMgZx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.