Type Here to Get Search Results !

नगरमध्ये घडली 'ही' धक्कादायक घटना; पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली

नगर: बीड जिल्ह्यातून कोंबड्या खरेदीसाठी जिल्ह्यात आलेल्या चौघांना जमावाने चोर समजून बेदम मारहाण केली. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि त्याच्या नातेवाईकांचा समावेश आहे. काही गावकऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे पालघरची पुनरावृत्ती टळली. सरपंच आणि पोलीस आल्यानंतर चौघांची सुटका झाली. जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी या चौघांनाच चोर समजून पकडले होते. ( ) वाचा: यासंबंधी मिळालेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील आष्टी येथील कोंबडी व्यावसायिक विशाल कांबळे, त्यांचे नातेवाईक असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे आणखी दोन नातेवाईक जामखेड तालुक्यात वंजारवाडी, फक्राबाद, अरणगाव या भागात गावरान कोंबड्या विकत घेण्यासाठी आले होते. तिथून पुन्हा ते गावाकडे निघाले होते. दरम्यान, अरणगाव परिसरातील वंजारवाडी येथे दिवसा घरफोडीची घटना घडली होती. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना त्यांचा संशय आला. अरणगाव येथे कांबळे यांच्या गाडीला वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी पाठलाग करून अडविले. त्यानंतर कांबळे यांच्या गाडीवर मोठमोठे दगड मारण्यात आले. चौघांना गाडीतून खाली खेचले गेले. गज, काठ्या व दगडाने जबर मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्याकडील पन्नास हजार रुपये काढून घेतले. मारहाणीत त्यांचे कपडेही फाटले. मारहाणीत विशाल काबंळे, कचरू निकाळजे, सुनील निकाळजे, जखमी झाले आहेत. यातील पोलीस अधिकारी कांबळे हे जमावाची समजून काढत होते. आपण पोलीस असून भावाच्या व्यवसायासाठी सुट्टी काढून आलो आहे. घाईगडबडीत ओळखपत्र आणलेले नाही. तुम्ही खात्री करून घ्या. आम्हाला मारहाण करू नका, अशी विनंती करीत त्या भागातील आपल्या काही ओळखीच्या लोकांचा संदर्भही देत होते. मात्र, संतप्त जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वाचा: या घटनेची माहिती अरणगावचे सरपंच यांना समजली. त्यांनी तेथे जाऊन जमावाला शांत केले आणि चौघांची सुटका केली. जामखेड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी या चौघांची चौकशी करून त्यांना उपचारासाठी जामखेड येथील रुग्णालयात हलविले. सरपंच अंकुश शिंदे व काही ग्रामस्थांमुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात विशाल कांबळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुमारे तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lQjmcr

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.