Type Here to Get Search Results !

'राष्ट्रध्वजाबाबत मुख्यमंत्र्यांनी 'हा' साधा नियम पाळावा'; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

मुंबईः मुख्यमंत्री () यांनी रविवारी संध्याकाळी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई लोकलसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यानचा एक स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत असून मुख्यमंत्री बसलेल्या खुर्चीमागे ठेवलेल्या झेंड्यावरुन वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील वकिल असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्ट लिहली आहे. असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील एक स्क्रीनशॉट फेसबुकवर शेअर करत एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. 'भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये हा साधा नियम पाळावा,' अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती, असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. वाचाः 'खरे तर मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये. दुर्दैव आहे भारतीय लोकशाहीचे की आज आपल्या देशात राष्ट्रध्वज केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला उत्सवी स्वरूपात मिरविण्याच्या कामाचे राहिले आहेत की काय असा प्रश्न पडतो. अनेकांसाठी त्यांचे राजकीय पक्षांचे ध्वज व धर्मध्वजच महत्वाचे आहेत. इतर कोणातच ध्वज महत्त्वाचा नसलेले भारतीय नागरिकच या देशाला अखंड ठेवतील. लोकशाही अशाच नागरिकांच्या व नेत्यांच्या शोधात आहे. भारतीय ध्वज संहिता इंडियन फ्लॅग कोड सगळ्यांनी वाचावा तसेच याबाबतच्या नियमांची माहिती घ्यावी,' असं आवाहन असीम सरोदे यांनी केलं आहे. असीम सरोदे यांच्या फेसबुक पोस्टवरुन सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. काहींनी असीम सरोदे यांचं समर्थन केलं आहे तर, संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वाचाः मुख्यमंत्र्यांनी लोकसंदर्भात काय घोषणा केली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधताना दोन लसमात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाचा मार्ग खुला करण्याची घोषणा केली. 'अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास मान्यता देत आहे. ज्या प्रवाशांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील, तसेच दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. दोन लसमात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारच्यावतीने अॅप विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी या अॅपवर जाऊन आवश्यक माहिती भरल्यानंतर त्यांना लोकल प्रवासासाठी पास मिळेल. तर ज्यांना अॅपवरून पास घेणे शक्य नाही, त्यांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातून ऑफलाइन पास घ्यावा, असंही त्यांनी म्हटलं आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AlTWHN

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.