Type Here to Get Search Results !

एटीएम फोडताना पोलिसांनी रंगेहात पकडले; बँक अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पुड टाकत त्याला बेदम मारहाण करत खेड तालुक्यातील खराबवाडी येथे असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम चार चोरट्यांनी फोडले. ही घटना रविवारी (१ ऑगस्ट) रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. त्यांनंतर पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहात पकडले. मात्र, दोन जण पसार झाले अहेत. याप्रकरणी चार चोरट्यांसह बँकेचे अधिकारी आणि इतर संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत कोंडीबा दूधगोंडे (वय १९, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर. मूळ रा. परभणी), ऋषिकेश किशोर पवार (वय २२, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर), प्रशांत (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही), छोटू भैया (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) या चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आयडीबीआय बँक व इतर संबंधितांना देखील या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी अनिकेत आणि ऋषिकेश या दोघांना अटक केली आहे. वाचाः पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लोखंडी रॉड, मिरची पुड, वॉकिटॉकी असे सर्व साहित्य घेऊन चोरटे आयडीबीआय बँकेच्या एटीएम जवळ गेले. आरोपी एटीएम फोडण्यासाठी आले असता तेथे उपस्थित आसणाऱ्या सागर मधुकर भांगरे (वय २२) या व्यक्तीला आरोपींनी हाताने मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी एटीएमचे बंद शटरचे कुलूप तोडून शटर उघडले. एटीएमच्या खालील बाजूचा बॉक्स उचकटून मशीन मधील वायरिंग कापले. तसेच एटीएमच्या बॉक्सवर असलेल्या कॅमेऱ्यावर काळ्या रंगाची टेप चिटकवली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यालाही पांढरा कागद आणि त्यावर काळ्या रंगाची टेप लावून चोरट्यांनी मशीन फोडली. या प्रकरणात किती रक्कम चोरीला गेली याबद्दल अद्याप समजू शकलेले नाही. त्यानंतर चोरटे पळून जात असताना दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सारंग चव्हाण तपास करत आहेत. वाचाः बॅंकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा पंधरा दिवसांपूर्वी चाकण परिसरात एटीएम फोडीचा गुन्हा घडला होता. त्या आधी आणि त्यानंतरही पोलिसांनी बँकांना एटीएम सुरक्षीततेबाबत नोटीस दिल्या होत्या. सुरक्षारक्षक, आलार्म, सीसीटीही कॅमेरे या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. मात्र, बॅंकांकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने बॅंकेच्या अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. वाचाः ?


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yecYz7

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.