Type Here to Get Search Results !

'सुशांतसिंह राजपूतचं काय झालं? एक वर्ष होऊनही सीबीआय गप्प का?'

मुंबई: 'अभिनेता (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास हाती घेऊन वर्ष उलटल्यानंतरही कोणत्याही निष्कर्षापर्यंत आलेली नाही. सीबीआयनं जाणीवपूर्वक मौन पाळलं आहे. मोदी सरकारचा राजकीय अजेंडा रेटण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर कसा होतोय, याचं हे उत्तम उदाहरण आहे,' असा आरोप काँग्रेसनं केला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनं सिनेसृष्टी हादरून गेली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये मोठं ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचं समोर आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळं या प्रकरणाला राजकीय वळण लागलं. सुशांतसिंहचा मृत्यू ही आत्महत्या नसून खून आहे, असा आरोप करत काही मंडळींनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. राज्य सरकारनं त्यास नकार दिला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. मुंबई पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयानंही समाधान व्यक्त केलं होतं. त्याच दरम्यान, या प्रकरणात बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून नंतर हा तपास सीबीआयकडं सोपवला. सीबीआयकडं तपास जाऊन एक वर्ष उलटून गेलं आहे. 'एम्स' रुग्णालयानं सुशांतचा मृत्यू हा खून नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याबाबतचा 'एम्स'चा अहवाल देऊनही ३०० दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप सीबीआयनं कुठल्याही निष्कर्षाप्रत आलेली नाही. त्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते () यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा: 'मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी व महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपनं सुशांत प्रकरणात बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा वापर केला. बिहारच्या निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपनं अत्यंत खालचा स्तर गाठला. सुशांत प्रकरणाभोवती खून, बलात्काराच्या खोट्या कथा रचल्या गेल्या. महाराष्ट्र सरकारवर संघटित हल्ले चढवण्यात आले. काही वृत्तवाहिन्यांना हाताशी धरून अपप्रचार करण्यात आला. भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत राहिले. सीबीआय व अन्य यंत्रणा बनावट माहिती लीक करत होत्या. भाजपच्या आयटी सेलनं हजारो फेसबुकस ट्विटर व यूट्यूबवर हजारो बनावट अकाऊंट उघडले. भाजपचा राजकीय अजेंडा रेटण्यासाठी हे सगळं केलं गेलं. पण आज वर्ष उलटूनही या प्रकरणात कुठलाही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. सीबीआय जाणीवपूर्वक मौन बाळगून आहे,' असं आरोप सावंत यांनी केला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ymkRT8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.