Type Here to Get Search Results !

अहमदनगरमधील 'हे' टिळक लढताहेत स्वराज्यासाठी लढा

अहमदनगर: अहमदनगरमधील रस्त्यांवर दुचाकीवरून फिरणारे हे आहेत . चेहरेपट्टी लोकमान्य टिळकांसारखी. शिवाय टिळकांचे स्वराज्याचे विचार पटलेले, त्यामुळे टिळकांसारखीच वेषाभूषा ते करतात. टिळकांना अपेक्षित असलेले स्वराज्य अद्यापही मिळालेले नाही. जेव्हा सार्वत्रिक निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदानाची पद्धत येईल, तेव्हा खरे स्वराज्य, असे लांडे मानतात. यासाठी सरकारी नोकरी सोडून विविध पातळ्यांवर त्यांचा लढा सुरू आहे. बाळासाहेब लांडे जलसंपदा विभागात नोकरीला होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचाराने प्रभावित झाले. त्यांच्यासोबत काही काळ काम केले. त्या काळात हजारे यांचा निवडणूक सुधारणांचा मुद्दा त्यांना भावला. त्यात लांडे यांनी लक्ष घालून अभ्यास केला. त्याद्वारे ते लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य संकल्पनेवरही बोलू लागले. त्यांची चेहरेपट्टी टिळकांशी मिळती जुळती, तोंडी टिळकांचेच विचार, त्यामुळे मित्रमंडळींनी तुम्ही टिळकांसारखे दिसता, असे म्हटले. त्यामुळे २०१३ पासून त्यांनी टिळकांसारखी वेशभूषा केली. लोकांना ती आवडली. तेव्हापासून ते याच वेशभूषेत वावरतात. निवडणूक सुधारणांचे आपले काम करता यावे, यासाठी त्यांनी सरकारी नोकरीतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. तेव्हापासून टिळकांच्या वेशभूषेत त्यांच्या विचारांचा प्रसार करीत ते फिरत असतात. दुचाकीवरून जाताना नागरिक त्यांच्याकडे कुतूहलाने पहातात. त्यांना कार्यक्रमांची निमंत्रणेही येत. वाचा: याबद्दल सांगताना लांडे म्हणाले, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवीनच, अशी अलौकिक घोषणा लोकमान्य टिळकांनी केली होती. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मूठभर इंग्रज येथील बाणेदारपणाला घाबरून पळून गेले. मात्र, स्वातंत्र्य मिळाले असले तरी खऱ्या अर्थाने स्वराज्य मिळालेले नाही. त्याला कारण आपली सदोष निवडणूक पद्धत होय. त्यामध्ये बदल करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. सध्याच्या पद्धतीत केवळ बहुमताचा उमेदवार विजयी होतो. ८० टक्के लोकांनी मतदान केलेले नसले तरीही तो त्यांचा लोकप्रतिनिधी ठरतो. उमेदवार यादीतून एकाच कोणाची तरी निवड करावी लागते. ही पद्धत बदलून पदवीधर मतदारसंघात असते तशी पसंतीक्रमानुसार मतदानाची पद्धत सर्वत्र आणली पाहिजे. मात्र, आपला निवडणूक आयोग हे मनावर घेत नाही. जनतेला अदयाप आडाणी समजले जाते. आता बदल झाला आहे, तंत्रज्ञान विकसित झाले आहे, लहानमुलेही ते वापरू लागले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बदल करणे आता अवघड नाही. निवडणुकाचा अनुभव घेण्यासाठी आपण स्वत: एकदा पदवीधर मतदारसंघातील निवडणूक लढविली. यात यश आले नाही, मात्र, पसंतीक्रमानुसार आपण ज्या उमेदवाराला एक मत दिले होते, तो विजयी झाला. त्यामुळे तो माझाही प्रतिनिधी ठरतो. पदवीधरला एक पद्धत आणि अन्य ठिकाणी दुसरी, हा भेदभाव आहे. तो बंद केला पाहिजे. निवडणूक सुधारणा करून खरे स्वराज्य आणण्याच्या मागणीठी आपण एक ऑनलाइन पीटीशनही फाइल केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपला हा लढा असाच सुरू ठेवणार आहोत टिळकांच्या विचारांचा प्रभाव आहेच, त्यांच्यासारखी वेशभूषा केल्यावर आणखी प्रेरणा मिळते. त्यामुळे आपण या वेषभूषेत वावरतो,’ असेही लांडे यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3idPy7u

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.