Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंची ती मागणी मान्य; मनसेनं केलं खास ट्वीट

मुंबईः लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकलमुभा () देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ()जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनसेनंही खास ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं होतं. त्यात मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी तातडीने सुरू करा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कालच्या भाषणात लोकलबाबत निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक ट्वीट केलं आहे. 'मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे,' असं खास ट्वीट मनसेनं केलं आहे. १५ ऑगस्टपासून लोकलप्रवासाची मुभा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधताना दोन लसमात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाचा मार्ग खुला करण्याची घोषणा केली. 'अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास मान्यता देत आहे. ज्या प्रवाशांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील, तसेच दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. दोन लसमात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारच्यावतीने अॅप विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी या अॅपवर जाऊन आवश्यक माहिती भरल्यानंतर त्यांना लोकल प्रवासासाठी पास मिळेल. तर ज्यांना अॅपवरून पास घेणे शक्य नाही, त्यांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातून ऑफलाइन पास घ्यावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X0HwXg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.