Type Here to Get Search Results !

भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणी जागीच ठार

: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सोमवारी दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले आहेत. शेवगा येथून दोन सख्ख्या बहिणी व मेहुणा असे ३ जण दुचाकीने अंबड मार्गे औरंगाबादकडे जात होते. डाबरूळ फाट्यावरून औरंगाबादकडे जाण्यासाठी वळत असताना कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असणारा एक जण गंभीर झाला आहे. अंबड शहराकडून जालनाकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने (क्र. एच.आर.३८ यु ६५४१) मोटरसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात दुचाकी लांबवर फरफटत गेली. या अपघातात मोटारसायकलवरील २ सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर मेहुणा गंभीर जखमी झाला. खडी वाहतूक करणाऱ्या हायवाने पादचाऱ्याला उडवले अंबड तालुक्यातील घनसावंगी फाटा येथे खडी वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक क्र.एम.एच.४६ ए.आर.७३४४ ने खडकेश्वर येथे जाण्यासाठी वाहनांची वाट पाहत असणाऱ्या खडकेश्वर येथील वयोवृद्ध इसम देविदास नामदेव म्हस्के (वय ७०) वर्ष यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. खडकेश्वर येथील देविदास नामदेव म्हस्के हे अंबडला काही कामासाठी घरून १ वाजण्याच्या सुमारास गेले होते. त्यानंतर अंबडहून घरी परतत असताना घनसावंगी फाट्यावर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खडी वाहतूक करणाऱ्या हायवाने त्यांना धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे वयोवृद्ध व्यक्तीला धडक दिल्यानंतरही सदर चालक खडी वाहतूक करण्यासाठी खडी क्रशरवर गेला. याबाबत माहिती मिळताच अंबड पोलिसांनी हायवा चालक दत्ता पांडुरंग काटोदे यास हायवासह ताब्यात घेऊन भास्कर कचरू म्हस्के यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CHN0Xw

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.