Type Here to Get Search Results !

मुंबईत किती जणांना घरी जाऊन लस दिली?; पालिकेनं जाहीर केला आकडा

मुंबईः मुंबईत आजारपण, वैद्यकीय कारणांमुळं अंथरुणाला खिळलेल्यांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास मुंबई महानगरपालिकेकडून १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. आजारपणामुळं लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे अवघड असलेल्या व्यक्तींसाठी सरकारने ही मोहिम हाती घेतली आहे. मोहिमेस प्रारंभ झाल्यापासून आत्तापर्यंत मुंबईत किती जणांना लस देण्यात आली याविषयीचा आकडा आज महानगर पालिकेनं मुंबई उच्च न्यायालयात जाहीर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज करोना विषयक याचिकांवर सुनावणी सुरु आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालायाने घरी जाऊन किती जणांना लस दिली, याचा तपशील देण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर मुंबई महापालिकेनं हायकोर्टात तपशील जारी केला आहे. वाचाः अंथरुणाला खिळलेल्या आणि घराबाहेर पडूच शकत नसलेल्या व्यक्तींसाठी लसीकरण करण्याच्या मोहिमेंतर्गत आजपर्यंत चार हजार ७१५ जणांनी नोंदणी केली होती. त्यानुसार आजपर्यंत ६०२ व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने मुंबई हायकोर्टात दिली आहे. पुढील बुधवारपर्यंत किती जणांना घरी जाऊन लस देण्यात आली, याचा तपशील अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर द्या, असे निर्देश मुंबई महापालिकेला हायकोर्टानं दिली आहे. तसंच, पुढील गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. वाचाः दरम्यान, हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ३७ व्यक्तींना घरोघरी जाऊन लस मात्रा देण्यात आली. पालिकेने अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींना घरोघरी जाऊन लस देण्याची मोहीम सुरू करताना, पहिल्या दिवशी १४ व्यक्तींना वृद्धाश्रमात जाऊन लस देण्यात आली. उर्वरीत २३ जणांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्यात आली आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xpwPKo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.