Type Here to Get Search Results !

करोना: अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६ हजारांवर; राज्याला हा मोठा दिलासा

मुंबई: राज्यात संसर्गाची दुसरी लाट हळहळू नियंत्रणात येत आहे. दैनंदिन रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत ५ हजार ६०९ नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ७ हजार ७२० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, आज करोनाने आणखी १३७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा आता १ लाख ३४ हजार २०१ इतका झाला आहे. ( ) वाचा: करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात होते. एकूण रुग्णसंख्या सात लाखांच्या घरात पोहचली होती. ही स्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ६६ हजारांपर्यंत खाली आली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक १३ हजार ८९२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर त्याखालोखाल ७ हजार २९७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ४६९, अहमदनगर जिल्ह्यात ६ हजार १९२, ठाणे जिल्ह्यात ६ हजार ७० तर महापालिका क्षेत्रात ४ हजार ५०१ इतकी आहे. वाचा: राज्यातील करोनाची आजची स्थिती - राज्यात आज १३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. - सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. - आज राज्यात ५ हजार ६०९ नवीन रुग्णांचे निदान. - दिवसभरात ७ हजार ७२० रुग्ण बरे होऊन परतले घरी. - राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५९,६७६ करोना बाधित रुग्ण झाले बरे. - राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८ % एवढे झाले. - आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह. - राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ६६ हजार १२३ इतकी. - सध्या राज्यात ४,१३,४३७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AxIJDQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.