Type Here to Get Search Results !

ही पेंग्विनची सेना, शिवसेनेतील बाटग्यांची यादी मोठी; राणेंचा शिवसेनेवर पलटवार

मुंबईः भाजप आमदार प्रसाद (Prasad Lad)लाड यांनी शिवसेना भवनासंदर्भात (Shivsena BHavan)केलेल्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. लाड यांना उत्तर देताना आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजपमध्ये (BJP)मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे, अशी जहरी टीका केली आहे. यावर भाजप आमदार ()यांनी ट्वीट करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी टीका शिवसेनेनं केली होती. शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना नितेश राणेंनी जोरदार पलटवार केला आहे. राणेंनी सलग काही ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. वाचाः 'शिवसेनेतील बाटग्यांचे महामंडळाची यादी तशी लांब आहे. पण थोडी माहितीसाठी. सचिन आहीर- बीकेसीची जबाबदारी, राहुल कनाल- शिर्डी संस्था, आदेश बांदेकर- सिद्धिविनायक संस्था, उदय सामंत- कॅबिनेट मंत्री, अब्दुल सत्तार- मंत्री, प्रियांका चतुर्वेदी- खासदार, अशी यादी नितेश राणेंनी जाहीर केली आहे. त्याचबरोबर आणखी एक ट्वीट करत, डाके, रावते, रामदास कदम, शिवतारे, राजन साळवी, सुनील शिंदे सारखे जुने शिवसैनिक दिसणार नाहीत,' असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. वाचाः 'नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय? आधी मराठी माणूस मुंबईतून हद्दपार केला. मराठीचे खरे मारेकरी. ही पेंग्विनची सेना. बाळासाहेबांची सेना आहे कुठे, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. शिवाय, मराठी माणसाची संघटना म्हणे, मग बेस्टच्या जागा- कनाकीय, बीएमसीचं कंत्राट- दिनो, रात्रीच्या पार्ट्या- पटानी, कपूर. इथे शाखा प्रमुख दिसत नाहीत, मराठी माणूस दिसत नाही?,' असा खोचक सवाल नितेश राणेंनी केलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zWU7ZO

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.