Type Here to Get Search Results !

'आरक्षणाची चर्चा सुरू असताना भाजपच्या खासदारांनी संसदेत तोंड का उघडलं नाही?'

मुंबई: आरक्षणासाठी मागास प्रवर्ग ठरवण्याबाबत राज्यांना अधिकार देणारे विधेयक काल लोकसभेत मांडण्यात आलं. त्यावर राज्यातील बहुतेक खासदारांनी आपली मतं मांडली. मात्र, मराठा समाजाचे केंद्रीय मंत्री , हे काहीच बोलले नाहीत. त्यावरून शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'भाजपच्या खासदारांनी संसदेत तोंड का उघडलं नाही?,' असा सवाल शिवसेनेचे खासदार यांनी केला आहे. (Sanjay Raut Attacks Narayan Rane and Raosaheb Danve) वाचा: राऊत हे दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. 'मागास प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार राज्याला देताना केंद्र सरकारनं आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा उठवायला हवी. पण सरकारनं तसं केलेलं नाही. हा तिढा कायम ठेवलाय. जोपर्यंत ही मर्यादा उठत नाही तोपर्यंत राज्यांना अधिकार देऊन काहीच उपयोग नाही. काल बहुतेक सर्व खासदारांनी हीच मागणी केली. मात्र, महाराष्ट्रातल्या भाजपच्या खासदारांनी तोंड उघडलं नाही. त्यांनी सुद्धा दणकून बोलायला हवं होतं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर ठाम भूमिका घेणारे रावसाहेब दानवे, नारायण राणे का बोलले नाहीत?,' असा सवाल राऊत यांनी केला. 'किमान संभाजीराजे यांनी त्याबद्दल बोलायला हवं. भाजपनं त्यांना बोलण्याची परवानगी न दिल्यास त्यांनी बंड करायला हवं. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे. आता काय होतं ते बघावं लागेल,' असं राऊत म्हणाले. वाचा: 'मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत लाखो लोकांनी मोर्चे काढले. अनेकांनी प्राण गमावले. आत्महत्या केल्या. केंद्र सरकारला हा खेळ वाटतो का? आम्ही या विधेयकाला विरोध करू शकलो असतो. पण आम्ही अडथळा आणणार नाही. त्यामुळं सरकारनं आता संवेदनशीलता दाखवून आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा उठवायला हवी. हे विधेयक अर्धवट आहे. हे बिल अर्ध आहे. हा भिजलेला फटाका आहे,' असं राऊत म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VBKSzT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.