Type Here to Get Search Results !

सपा आमदार अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल; 'हे' आहे कारण

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार () यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर मुंबईत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तलवारीने केक कापणे आणि करोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी रविवारी ५.१५ ते ८.३५ वाजताच्या दरम्यान त्यांच्या जन्मदिवसानिमित्त शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी २५ ते ३० कार्यकर्त्यांचा जमाव करून शासनाच्या करोना प्रादुर्भाव प्रतिबंधक आदेश व जमावबंदी आदेशाचा भंग केला. तसंच अबू आझमी व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार हे हत्यार बाळगलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून फिर्याद दाखल करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. कोणा-कोणावर दाखल झाला गुन्हा? १) आमदार अबू असिम आझमी, २)फहाद खान उर्फ आझमी, ३) इरफान खान, ४) गैसउददिन शेख, ५) आयशा खान, ६)अक्तर कुरेशी, ७) मनोज सिंग, ८)सद्दाम खान, ९)तौसीफ खान, १०)जावेद सिद्दिकी, ११) नौशाद खान, १२) वसिम जाफर शेख, १३) अकबर खान, १४) इर्शाद कुरेशी ऊर्फ बबलू लोटस, १५) रईसा सय्यद, १६) शेहजाद ऊर्फ सय्यद, १७) शकील पठाण, १८) रुक्साना सिद्दिकी आणि इतर काही अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37tYQGg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.