Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पहिला मोठा दिलासा

म. टा. प्रतिनिधी, जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या महसूल विभागाकडून सुरू आहे. जिल्ह्यात महापुरामुळे बाधित झालेल्या ११३ गावांमधील १६ हजार ८७९ कुटुंबांचे पंचनामे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर, तातडीची मदत म्हणून लवकरच पूरग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यात दहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली. सांगली जिल्ह्यात महापूर आणि अतिवृष्टीमुळे मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील ११३ गावे बाधित झाली आहेत. महापालिका क्षेत्र व ग्रामीण भागातील एकूण ४५ हजार ३५२ कुटुंबं बाधित झाली आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील कुटुंबं, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे वेगानं करण्यात येत आहेत. आजपर्यंत १६ हजार ८७९ कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्ण नष्ट झालेली कच्ची घरे २७९, पक्की घरे ८, अशंत: नष्ट झालेली कच्ची घरे १ हजार ७८, पक्की घरे ३२०, नुकसान झालेल्या झोपड्या ३४ व गोठे ६१९ आहेत. अजूनही पंचनामे सुरू आहेत, असं चौधरी यांनी सांगितलं. वाचा: पुरामुळे मयत पशुधनापैकी ९६ लहान-मोठी जनावरे व ४९५०८ पक्ष्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तसेच आजअखेर २७ कारागीरांचे सहयंत्राचे, ३९ कारागीरांचे कच्च्या व तयार मालाचे, तसेच २२७९ छोटे उद्योग, दुकाने, टपरीधारक, हातगाडीधारक इत्यादीचे पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्यात महापूर व अतिवृ़ष्टीमुळे २७४ गावांतील ९७ हजार ४८६ शेतकऱ्यांचे ४० हजार ६७१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यातील १७४ गावांतील २४ हजार ७८१ शेतकऱ्यांचे ८ हजार ५०८.७२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मिरज तालुक्यात २६ गावांतील २९ हजार ११७ शेतकऱ्यांच्या १० हजार ३४० हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. त्यापैकी २१ गावांतील ३ हजार ७१२ शेतकऱ्यांचे १ हजार ७२८.६४ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. वाचा: वाळवा तालुक्यातील ९८ गावांतील ३१ हजार २४५ शेतकऱ्यांचे १३ हजार ४९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी ४१ गावांतील ७ हजार ७०१ शेतकऱ्यांचे २ हजार ६९७.६० हेक्टर पंचनामे पूर्ण झाले आहेत. शिराळा तालुक्यातील ९५ गावांतील १५ हजार ३५० शेतकऱ्यांचे ६ हजार ६३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी ८७ गावांतील ८ हजार ७८६ शेतकऱ्यांचे १ हजार ८९३.६१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पलूस तालुक्यातील २६ गावांतील २१ हजार ५९५ शेतकऱ्यांचे १० हजार १४६ हेक्टर बाधित झाले आहे. त्यापैकी २३ गावांतील ४ हजार ५२३ शेतकऱ्यांचे २ हजार १६२.१८ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तासगाव तालुक्यातील २ गावांतील १७९ शेतकऱ्यांचे ५९ हेक्टर बाधित झाले आहे. त्यापैकी २२ गावांतील ५९ शेतकऱ्यांचे २६.६९ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून तातडीची मदत वेळेत मिळत नसल्याने पूरग्रस्तांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iiF32K

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.